शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोराडीच्या विद्यार्थ्यांनी जपली माणुसकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 11:56 IST

शिरपूर : स्फोटात मृत्यू पावलेल्या उज्जैनसिंग राजपूत यांच्या कुटुंबाला मदत

शिरपूर :  तालुक्यातील  वाघाडी येथील रासायनिक कारखान्यात बॉयलरच्या स्फोटात १४ कामगार मृत्युमुखी पडले व अनेक गंभीर जखमी झाले. या स्फोटात बोराडी येथील डॉ.बी.आर.आंबेडकर अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थीनी रोशनी हिचे वडील उज्जैनसिंग राजपुत यांचा देखील मृत्यु झाला़ रोशनी ही हुशार व गुणी विद्यार्थिनी असून तिच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे म्हणून अध्यापक विद्यालयाने तिच्या परिवाराला बोराडी शैक्षणिक परिसरातून आर्थिक  मदत करण्याचे ठरविले. गेल्या आठवड्यात वाघाडीजवळ केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात १४ जणांचा मृत्यु तर ७२ जण जखमी झाल्याची घटना घडली होती़ या घटनेत बोराडी येथे शिक्षण घेणारी रोशनी हिचा वडीलांचा देखील मृत्यू झाला़ त्यामुळे तिचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे बोराडी परिसरातील शाळा महाविद्यालयात जाऊन शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. त्यात मातोश्री बनुमाय कन्या विद्यालय, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, फार्मसी कॉलेज, बी.ए.एम.एस.  कॉलेज, डि.एड.कॉलेज बोराडी, ज्यूनियर कॉलेज बोराडी मधील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी मदत देऊन खारीचा वाटा उचलला. यामध्ये विशेष करून मातोश्री बनुमाय विद्यालयातील मुलींनी आपल्या  खाऊसाठी आणलेले पैसेदेखील मदत म्हणून दिले.बी.ए.एम.एस कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवासाठी जमा केलेली वर्गणी तसेच फन फेयरसाठी आणलेले पैसे मदत म्हणून या भावी डॉक्टर्सनी मदत म्हणून दिलेत. एकंदरीत माणूसकीचा गहिवर या छोट्या-छोट्या मुलामुलींच्या ह्रदयातून ओसंडत होता. आजही माणूसकी  जिवंत आहे याचे मुर्तीमंत उदाहरण रोशनी राजपूतला केलेल्या आर्थिक  मदतीवरून दिसून आले. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे या उक्तीचा प्रत्यय आज बोराडी शैक्षणिक परिसरातून दिसून आला.यावेळी ९ हजार ३० एवढी रक्कम जमा झाली. या तुटपुंज्या रोशनी राजपूतचे कुटुंब श्रीमंत होणार आहे अशातला भाग नाही. पण तिला केलेल्या या आर्थिक मदतीला अनेकांचे हात तिच्या पाठीमागे  खंबीरपणे उभे राहीलेत़ या धीराने ती व तिचे कुटुंब भावनिक दृष्ट्या जास्त श्रीमंत झाले हे नक्की. याप्रसंगी अध्यापक  विद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा वैद्य, प्रा.उदय भलकार, जयसिंग पावरा, अनिल लुंगसे, वैशाली निकम, भुषण पाटील, माधव ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले़

टॅग्स :Dhuleधुळे