शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पहिल्याच दिवशी नवागतांमध्ये पुस्तकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:27 IST

विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह

धुळे : विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दोन दिवसांपूर्वीच शाळा सज्ज झाल्या होत्या. सकाळी ७ वाजता पहिली घंटा होताच शाळाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी वाजंत्री लावून, तर काही ठिकाणी गुलाबपुष्प देवून स्वागत झाल्याने, विद्यार्थीही भारावले होते. पहिल्याच दिवशी नवी पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थी भारावरुन गेले होते. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साह दिसून येत होता.मालपूरशिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत व गणवेश वाटप, पुस्तक वाटप, दप्तर करण्यात आले. पहिल्याच दिवशी गावात प्रभात फेरी काढण्यात आली व नविन विद्यार्थ्यांचे स्वागताचा कार्यक्रम महाविरसिंह रावल यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमास लोकनियुक्त ग्रामपंचायत सरपंच मच्छिंद्र शिंदे, श्रावण अहिरे, व्याघ्रंबरी दूध संस्थेचे अध्यक्ष पोपट बागुल, मगन बागुल, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विविध सस्थांचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविरसिंहजी रावल यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक व्ही.डी. कागणे यांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात नविन कोणते उपक्रम शाळेत राबवले जातील या विषयी माहिती दिली. यावेळी शाळेचे उपमुख्याध्याप आर.डी. वसईकर, पर्यवेक्षक आर.बी.सूर्यवंशी, ग्रंथपाल प्रमोद राजपूत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.बैलगाड्यावरून मिरवितविद्यार्थ्यांचे स्वागतकापडणे - येथील नवजीवन विद्या विकास मडळ संचलीत आदर्श माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी बैलगाड्यावरून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. शाळेत देखील पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.यावेळी नवजीवन विद्या विकास मडळाचे अध्यक्ष शशीकात भदाणे, मुख्याध्यापिका उषा पाटील, रमेश भदाणे, खजिनदार अक्षय भदाणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र मोरे, भिमराव कुंभार आदि उपस्थित होते. ग्रा.प.चौकातून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. त्या नंतर विद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी इ.१० वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यासाठी मुख्याध्यापिका उषा पाटील,एम.पी. पाटील, आर.के. पाटील, बी.एन. पाटील, वाय.आर. पाटील, स्वाती भदाणे, नरेंद्र पाटील, जिजाबराव माळी, माधुरी भदाणे, कमलेश देसले, अमोल अवारे, साहेबराव पाटील, मधुकर वाडीले, भुषण पाटील आदिंनी परिश्रम घेतले.शिरपूरअहिल्यापूर- येथील आर.सी. पटेल विद्यालयात नवागताचे स्वागत, शाळा शुभारंभ व पुस्तक वाटप झाले़़ यावेळी सरपंच संग्रामसिंग राजपूत, प्राचार्य आर.बी.भदाणे, पी.के. पाटील उपस्थित होते.खर्दे- येथील आऱसी़पटेल प्राथमिक शाळेत प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सजवलेल्या बैलगाडीत बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बसून गावात बँडच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या बैलगाड्यांवर बसून चिमुकले मोठ्या आनंदाने गावभर मिरवणूकीत सामील झाले होते. तसेच शाळेला फुग्यांनी तसेच वेगवेगळ्या रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी रिशा पटेल, सरपंच सरिताताई गुजर, रंजना शर्मा, स्मिता महांते, विजय पटेल, मुख्याध्यापक प्रदीप गहीवरे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशीला मराठे, वसंत भामरे, छाया पाटील, अनिल माळी, विजय गुजर, शरद गुजर यांनी मेहनत घेतली.टेकवाडे- येथील आऱसी़पटेल प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व तीलक करून सजवलेल्या बैलगाडीतून गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सोबत शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती बाबत व शैक्षणिक जनजागृती केली. यावेळी सरपंच संजय धनगर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलाल पटेल, उपाध्यक्ष शांतीलाल भलकार, संतोष ढोले, श्रीकृष्ण वाडीले, दाजभाऊ राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत, सुकलाल दावडे, भारती वाडीले उपस्थित होते.यावेळी पहिलाच दिवस गोड व्हावा म्हणून मिष्ठान्न भोजन देण्यात आले़ शाळेचे मुख्याध्यापक बी.आर. महाजन यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन आर.पी.कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे