शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राईनपाडा येथील घटनेतील मृतदेह ताब्यात घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:48 IST

नातेवाईकांचा पवित्रा : मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख व एकास शासकीय नोकरीची मागणी, पिंपळनेरजवळील वस्तीत ठिय्या, मंगळवेढा परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामस्थ दाखल  

ठळक मुद्देप्रत्येकी २५ लाख, एकास शासकीय नोकरीची मागणी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार मंगळवेढा परिसरातील काही गावांचे सरपंच, ग्रामस्थ दाखल पिंंपळनेरकरांकडून मृतांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना मदतीचा हात 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे रविवारी जमावाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख रूपये व एकास शासकीय नोकरी द्या, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान मंगळवेढा परिसरातील काही गावांचे सरपंच व ग्रामस्थ पिंपळनेर येथे दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांनी येथील त्यांच्या वस्तीवरच या मागणीसाठी ठिय्या दिला आहे. रविवारी राईनपाडा येथे घडलेल्या क्रूर घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रात्री उशीरा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांनी शासनाकडे घटनेतील पाचही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपये व कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत येथील वस्तीवरच ठिय्या दिला आहे. सरपंच, ग्रामस्थ दाखल दरम्यान घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवेढा परिसरातील खवे, मानेवाडी व अन्य गावांचे सरपंच व नाथपंथी डवरी समाजाचे ग्रामस्थ येथे येऊन दाखल झाले. समाजातील आणखी काही प्रतिष्ठित व्यक्ती पिंपळनेर येथे दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतरच आम्ही शासनाशी चर्चा करून आपला निर्णय जाहीर करू, असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. पिंंपळनेरकरांकडून मदतीचा हात या घटनेनंतर वस्तीवर चूल पेटली नसून मृतांच्या कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना मदत करण्यासाठी पिंपळनेरकर सरसावले आहेत. तेथील विविध संस्था, संघटना व व्यक्तींकडून त्यांच्या चहापानासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली. इतरही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १२ जणांसह जमावाविरूद्ध खुनाचा गुन्हा; २३ जणांना अटक  दरम्यान या क्रूर घटने प्रकरणी खूनाच्या भादंवि ३०२ कलमासह अन्य विविध कलमांन्वये १२ संशयितांसह जमावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पैकी २३ जणांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पिंपळनेर पोलिसांनी सांगितले. या घटनेतील १२ संशयितांची ओळख पटली असून त्यांची नावे अशी : बाळू मन्याराम भवरे, सुरेश मोतीराम बोरसे, अशोक गोपाल राऊत, महारू वनक्या  पवार सर्व रा.राईनपाडा, मोतीराम काशिनाथ साबळे रा.निळीघोटी, ता.साक्री, दीपक रमेश गागुडे रा,सुतारे, ता.साक्री, बाबुलाल महाळचे, संदीप महाळचे, दिलीप गवळे सर्व रा.रनमळी, सुरेश कांबळे रा.काकरपाडा, काळू सोन्या गाीत, सोमा मावच्या काळ्या. यांच्यासह अन्य अनोळखी २० ते २५ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी २३ जणांना अटक केली असून उर्वरीतांना अटकेची प्रक्रिया सुरूच आहे. या सर्वांविरूद्ध पिंपळनेर पोलिसांत गुरनं ७४/२०१८ भादंवि कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४१, ३४२, ३५३, ३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा