शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहीवेलनजीक महामार्गावर सुरक्षारक्षकाचा निर्घृण खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 16:31 IST

घटनास्थळी काहीही चोरीस न गेल्याने कारण गुलदस्त्यात

ठळक मुद्देखूनासाठी तीक्ष्ण हत्याराचा वापर उभ्या ट्रकपासून मृतदेह ५० फुटावर सापडलाघटनास्थळी काहीही चोरीस न गेल्याने कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कदहीवेल, ता. साक्री : दहीवेल-नंदुरबार रस्त्यावर दहीवेल चौफुलीपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावरील व्यापारी शेडच्या परिसरात तेथील सुरक्षारक्षकाचा (वॉचमन) तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भिवाजी गोपाळ देसाई (वय  ५४, रा.डाबरीपाडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दहीवेल येथील मक्याचे व्यापारी कैलास वसंतराव चौधरी यांचे दहीवेल-नंदुरबार रस्त्यालगत शेड आहे. तेथे रात्रपाळीसाठी सुरक्षारक्षक म्हणून भिवाजी देसाई काम करत होते. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे ड्यूटी बजावण्यासाठी आलेले होते. रात्री  कैलास चौधरी यांच्या मालकीच्या असलेल्या उभ्या ट्रक (क्र.एमएच १८- एम १२३९)च्या कॅबिनमध्ये ते झोपले होते. मात्र देसाई यांचा रात्री तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून खून करण्यात आलो. त्यांच्या अंगावरील कपडे फाटले असून बाजूला पडले होते. तर  काही अंतरावर झटापट झाल्याच्या खुणाही दिसून आल्या. त्यांच्या शरीरावर जखमाही दिसत आहेत. ट्रकच्या पुढील काचेला तडा गेला असून त्यांचा मोबाईल ट्रकच्या मागे असलेल्या मक्यावर पडलेला सापडला. तर देसाई यांचा मृतदेह ट्रकपासून अंदाजे ५० फूट अंतरावर आढळला आहे. दरम्यान घटनास्थळावरून प्र्रथमदर्शनी काहीही चोरीस गेलेले नाही. त्यामुळे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. बुधवारी सकाळी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दहीवेल दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल वसावे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील तत्काळ घटनास्थळी पोहचले होते. त्यानंतर साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एस. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पवार हेही घटनास्थळी आले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. तपासासाठी माहिती घेण्याचे कामही सुरू होते. देसाई यांचा मुलगा योगेश याने दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.