शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:30 IST

जिल्हा प्रशासन : जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह ७१ जणांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सोमवारी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ जिल्हाधिकारी संजय यादव यांनी स्वत: रक्तदान करुन या शिबीराचे उद्घाटन केले़कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांना प्रतिसाद म्हणून महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले. रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे आजच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवसभरात किमान १०० जण रक्तदान करतील, असा विश्वाास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त करीत सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी रक्तदान करावे. आवश्यकता भासली तर नागरिकांनी रक्तपेढीत जावून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले़गेल्या काही दिवसांपासून रक्ताची टंचाई जाणवत आहे. ही बाब जिल्हाधिकाºयांनी महसूल अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून देत रक्तदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी रक्तदान शिबिराची पार्श्वभूमी विशद केली. कोणतीही आपत्ती असो, महसूल विभागाचा कर्मचारी मदतीसाठी पुढे असतो. आजच्या रक्तदान शिबिरातही हा कर्मचारी पुढेच आहे, असे त्यांनी सांगितले. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मन्सूर शेख, उपाध्यक्ष छोटू चौधरी, सचिव अविनाश सोनकांबळे, सहसचिव योगेश जिरे, कोशाध्यक्ष उमेश नाशिककर, संजय शिंदे, श्रीकांत देसले, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. वाय. कुलकर्णी, चिटणीस वाय. आर. पाटील, राज्यस्तरीय सदस्य एस. बी. मोहिते, ए. ए. भामरे, कार्याध्यक्ष सी. यू. पाटील आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.रक्तदान करताना सुरक्षीत अंतर ठेवले होते़

 

टॅग्स :Dhuleधुळे