लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मागासवर्गीयांचे सरकारी नोकरीतील आरक्षण संपूष्टात आणण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवारी क्युमाईन क्लब जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली़अनुसूचित जाती जमातींना सरकारी नोकरीत आरक्षणाचा मुलभूत अधिकार नाही़ तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची नाही असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे़ हा दावा मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने देखील नोकºयांमध्ये आरक्षण देणे सरकारवर बंधनकारक नाही असा निर्णय दिला़ न्यायालयाचा हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे़ उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे़ या सरकारची भूमिका मागासवर्गीयांचे आरक्षण संपूष्टात आणण्याची आहे़ त्याची सुरूवात त्यांनी उत्तराखंडपासून केली आहे, असे काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़पक्षाचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी सांगितले की, भाजप सरकार आरक्षण संपूष्टात आणत असल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित झाला तेव्हा मोदी सरकारने संसदेची दिशाभूल केली आणि जबाबदारी झटकली़ वास्तविक पाहता १९ नोव्हेंबर २०१९ रोजी उत्तराखंडमध्ये भाजप सरकारने मुकेशकुमार यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ ७ फेब्रुवारी २०२० च्या सुनावणी वेळी सरकारच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादाच्या आधारावर न्यायालयाने निकाल दिला़ यात आधीच्या काँग्रेस सरकारचा काहीही संबंध नाही़ परंतु संसदेत मंत्र्यांनी काँग्रेस सरकारवर खापर फोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे़ मुळात दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय कल्याण योजनांच्या निधीत केंद्र सरकार सातत्याने कपात करीत आहे़ एससी, एसटी सब प्लान्टच्या माध्यमातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जात होता़ परंतु सध्याचे सरकार त्यातही कपात करीत आहे़आरक्षण संदर्भातील भूमिका केंद्र सरकारने संसदेत जाहीर करुन मागासवर्गीयांवरील अन्याय थांबवावा़ अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तिव्र स्वरुपाचे देशव्यापी जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे़यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, डॉ़ दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, मुकूंद कोळवले, प्रदेश सरचिटणीस डॉ.अनिल भामरे महिला आघाडी अध्यक्षा गायत्री जयस्वाल, महिला काँग्रेस अध्यक्ष बानुबाई शिरसाठ, भिवसन अहिरे, शिंदखेडा महिला उपाध्यक्षा भावना कमलेश पवार, साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, मनोहर पाटील, उत्तमराव माळी, काँग्रेस सेवादलचा जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते़
आरक्षण संपूष्टात आणण्याचा भाजपचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 22:44 IST