शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित यश मिळवून भाजपचे महापालिकेवर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 18:08 IST

धुळे महापालिका निवडणूक : राष्टÑवादीकडू सत्ता हिसकावली 

सुरेश विसपुते  धुळे - महापालिकेच्या निवडणुकीत ७३ पैकी एकहाती ५० जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाकडून सत्ता अक्षरश: हिसकावून घेतली. भाजपच्या या विजयामुळे राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची सलग १५ वर्षांची सत्ता लयास गेली असून भाजपने अपेक्षित यश प्राप्त करत येथील महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपने निवडणुकीची जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांकडे सोपविली होती. पालघर, नाशिक, जामनेर, सांगली व जळगाव येथे त्यांच्या नेतृत्वात पक्षाने मोठे विजय प्राप्त केल्याने येथील निवडणुकीला स्वाभाििवक एक वलय प्राप्त झाले. त्यात या पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने सुरूवातीपासून निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंत्री गिरीष महाजन यांनी निवडणुकीत ‘फिफ्टी प्लस’चा नारा दिला होता. गेल्यावेळी अवघ्या तीन जागांवर या पक्षाला विजय मिळाला होता. त्यामुळे एकदम ५० किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळवू, असे त्यांचे सांगणे अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले होते. परंतु नियोजनबद्ध प्रयत्नांनी त्यांनी हे यश खेचून आणले, असेच म्हणावे लागेल. पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी या निवडणुकीत पक्षापासून फारकत घेतली. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची पक्षाशी सुंदोपसुंदी सुरू होती. अखेरीस त्यांनी लोकसंग्राम पक्षाच्या नावाखाली वेगळी चूल मांडली. त्यानंतर भाजपने आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पक्षाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल मंत्री गिरीष महाजनांसोबत होते. पक्षाने आरोप व विरोधाला फारसे महत्त्व न देता आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी सूक्ष्म नियोजन व व्यवस्थित प्रयत्न केले. शहराचा वर्षानुवर्षे खुंटलेला विकास, मूलभूत सोयीसुविधांची परवड या मुद्यांवर भर देत शहर विकासाचा नारा दिला. शिवाय शहरातील नागरिकांकडून आॅनलाईन सूचना मागवून त्यावर आधारित जाहीरनामा पक्षाने तयार करून प्रकाशित केला. त्यामुळेही नागरिक भारावले. पक्षाच्या यशात त्याचाही मोठा वाटा आहे. येथील नागरिकांच्या मनाला  गेल्या अनेक वर्षांपासून प्रशस्त रस्ते, रोज पाणीपुरवठा, भूमिगत गटारी, पथदिव्यांची व्यवस्था, उद्योग व व्यापाराचा विकास अशा अनेक विकासात्मक मूलभूत गोष्टींची आस लागली आहे. त्यालास भाजपने साद घातली. आणि नागरिकांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले.  त्यामुळे या पक्षाला आजचा हा  मोठा विजय साकारता आला. लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान आता भाजपपुढे आहे. त्यासाठी मूलभूत सोयीसुविधांसह हॉकर्स झोन, व्यापार-उद्योगांचा विकास, उद्यानांची निर्मिती अशा अनेक बाबींची वेळेत पूर्तता करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत.