शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:42 IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची टीका, शिंदखेड्यात झाली सभा

ठळक मुद्दे नगरपंचायत निवडणुकीनिमित्त माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभासभेत केंद्र व राज्य शासनावर केली टीका नांदेड मनपाप्रमाणेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा: ‘अच्छे दिन’चे स्वप्न जनतेला दाखवून केंद्र व राज्यात सत्ता मिळविणारे भाजपा सरकार गेल्या तीन वर्षाच्या काळात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, जनता, व्यापारी हे त्रस्त झालेले आहेत. भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही.त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्या असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केले.शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीनिमित्त कॉंग्रेसची प्रचार सभा शुक्रवारी शहरातील गांधी चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहीदास पाटील, डॉ. हेमंत देशमुख, आमदार डी.एस. अहिरे, अब्दुल सत्तार, कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, कॉँग्रेसच्या अ‍ॅड.ललिता पाटील आदी होते.अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मोदी लाटेवर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली. ‘मन की बात’, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. सरकारतर्फे विकास कामांची वल्गना केली जात असतांना, प्रत्यक्षात काही होत नसल्याने, सरकारने आता ‘काम की बात’ करावी अशी परिस्थिती असल्याचे सांगत, चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.बोंडअळीमुळे नुकसानराज्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे १७०० कोटी रूपयांचे नुकसान झाले. सरकारने १५ लाख शेतकºयांना ३४०० कोटी रूपयांची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. सरकारतर्फे ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जातो आहे. परंतु हे मेक इन इंडीया नव्हे तर फेक इन इंडीया आहे. जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविणारे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी जे नांदेड मनपा निवडणुकीत जनतेने करून दाखविले तेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत करून, कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.