शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूचा धोका नाही, पण काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:00 IST

अहमदाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव आढळल्याच्या आनुषंगाने जिल्ह्यात दक्षता बाळगत 25 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे,

धुळे : गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव आढळल्याच्या आनुषंगाने जिल्ह्यात दक्षता बाळगत 25 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ वाय़ बी़ साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़ गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात आणि दीव-दमण परिसरात बर्ड फ्लू या आजाराची लागण झाली आह़े महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत हा भाग येतो़ त्यामुळे धुळे जिल्ह्यात या आजाराच्या आनुषंगाने दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत़  कारण गुजरातच्या सीमेलगत  धुळे जिल्हा येत असल्याने  पशुसंर्वधन विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पथकाला सूचनाजिल्ह्यातील आपापल्या गटातील प्रत्येक खासगी कुक्कुटपालन व्यावसायिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आजाराची साथ आहे किंवा नाही, याची खात्री करावी़ एखाद्या केंद्रावर साथीचा आजार सुरू असल्यास जास्त  प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा नाही याची खात्री करावी़ पक्ष्यांचा मृत्यू अनैसर्गिक आहे का याची खातरजमा करावी़ कुक्कुटपालन केंद्रावर अशा प्रकारच्या साथीचा आजार येऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्याचे सांगण्यात आले आह़े त्यात शेडभोवती चुना स्प्रेड करणे, शेडमध्ये कर्मचा:यांव्यतिरिक्त कोणासही प्रवेश देण्यात येऊ नये, अशा केंद्राना भेट देणा:या व्यक्तीसाठी स्वच्छ कपडय़ांची व्यवस्था करावी, कोंबडीची पिल्ले आणणे व विक्रीबाबतची नोंद ठेवणे, काही आजारांमुळे पक्षी मतरुक असल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी तत्काळ संपर्क साधून मदत घेणे तसेच मृत झालेल्या पक्ष्यांची विल्हेवाट योग्य रितीने लावणे, अशा विविध बाबी यात अंतभरूत असणार आह़े संपूर्ण जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भावाचे सव्रेक्षण अधिक जोमाने करून त्याचा अहवाल दर आठवडय़ास न चुकता पाठविण्यात यावा, असे आदेश पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले आहेत़