शिरपूर - मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास इंदोर कडून शिरपूरकडे येणाऱ्या खासगी बसने महाराष्ट्र मध्यप्रदेश हद्दीवरील बिजासन घाटात अचानक पेट घेतला. वेळीच चालकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने बस थांबवून सुचकता दाखवित बसमधील प्रवाशांना खाली उतरवून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र बहुतांशी प्रवासाच्या बॅग जळून खाक झाल्यात, गाडी पूर्णत: खाक झाली.
बिजासनी घाटात खासगी बस पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 09:17 IST