शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणासाठी देशभर सायकल भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:17 IST

शिरपूर : उत्तराखंडमधील ५८ वर्षांचे भूपेंद्रसिंह मेहरा यांनी घेतला जनजागृतीचा वसा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी या उद्देशाने उत्तराखंडमधील नैनीताल जवळील हल्द्वानी येथील ५८ वर्षाचे भूपेंद्रसिंह मेहरा चक्क सायकलवरून देशभर जनजागृती करीत आहेत़ सध्या ते मार्गस्थ होत असतांना शिरपूरला मुक्कामी आले होते, त्यानंतर ते गुजरातकडे रवाना झालेत़प्लॉस्टिकमुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे़ उत्तराखंडामध्ये संपूर्णत: प्लॉस्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे़ महाराष्ट्र शासनानेही अगदी तशाच प्रकारे बंदी घालावी़ पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॉस्टिकरवर बंदी घालणे आवश्यक आहे, असेही मेहरा यांनी सांगितले़दरम्यान, कुणीही प्लॉस्टिकचा वापर करू नये, झाडांची कत्तल थांबवावी, असा संदेश ते गावोगावी जावून देत आहेत़ स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे़पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड मोहिम व स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती सायकलवरून करतांना वेगवेगळे अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना भेटून चर्चा होते, त्यांना या विषयाचे महत्व पटवून दिले जाते़ आतापर्यंत त्यांनी पाच लाख लोकांपर्यंत पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश पोहचविण्याचे समाधान लाभल्याचे सांगितले. सन २०१३ पासून सायकलवरून भारत भ्रमणाला सुरूवात केली़ पहिल्याच वर्षी १४३० किमीचा प्रवास सायकलवरून केला़ २०१५ मध्ये या मोहिमेबाबत मुख्यमंत्री देवेंद फडणवीास यांची भेट घेतली़ यंदा उत्तरप्रदेशात्तील १४ जिल्ह्यांतून सायकलवरून भ्रमंती केली़ त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्ऱ महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांतून प्रवास करून ते शिरपूरला पोहचलेत़ एवढे सर्व केवळ पर्यावरण संरक्षण, संवर्धन संदेश लोकांपर्यंत पोहचून त्यांनी प्लॉस्टिकचा वापर करू नये यासाठीच ते काम करीत असल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे