शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झालेच नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:38 IST

अनिल गोटे यांची माहिती : उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार 

ठळक मुद्देमनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला अद्याप तांत्रिक मंजुरीच नाही या रेल्वेमार्गाशिवाय मतदारसंघाचा विकास होणे शक्य नाही मतदारसंघातील दलित, मुस्लिम व आदिवासी समाजबांधव या रेल्वेमार्गाच्या बाजूने 

लोकमत आॅनलाईन धुळे : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झालेले नाही. १६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी या मार्गाचे भूमिपूजन केल्याचे  सांगितले जाते. मात्र या रेल्वेमार्गाला अद्याप तांत्रिक मंजुरीच मिळालेली नाही, हे वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वत: आपण या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन केले, असे म्हटलेले नाही, असे आमदार अनिल गोटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या मार्गाच्या जमीन अधिग्रहणाची नोटीस अद्याप दिली गेलेली नाही. तशी ती द्यावी लागते. त्यानंतर हरकती, सूचना महत्त्वाच्या आहेत. मला संधी मिळाल्यास दोन वर्षात या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरूवात होईल. तसेच धुळे शहराजवळ रेल्वेला कारखान्यासाठी मोफत जागा मिळवून देईल. मी जाती-धर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे. संपूर्ण मतदारसंघात फिरून मी सर्वसामान्य, शेतक-यांशी चर्चा केली. गेल्या ६० वर्षात नाव घेता येईल असा एकही प्रकल्प मतदारसंघात आलेला नाही. कॉँग्रेसचे विजय नवल पाटील यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले. त्या नंतर गेल्यावेळी डॉ.सुभाष भामरे यांना मंत्रीपद मिळाले. परंतु मतदारसंघातील लोकांना काही मिळालेले नाही. मनमाड-इंदूर हा ३६६  कि.मी. रेल्वेमार्गाच्या निर्मितीशिवाय या मतदारसंघातील दलित, मुस्मिल व आदिवासी समाजबांधवांचे नशीब बदलू शकत नाही. ते सर्व या रेल्वेमार्गाच्या बाजूने आहेत. मंगळवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करू, असेही ते म्हणाले. यावेळी तेजस गोटे, दिलीप साळुंखे, हिंमत पवार, प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Dhuleधुळे