डॉ. प्रशांत प्रकाश चौधरी हे पीएच. डी.-डॉक्टरेट, संशोधक होते. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध शोधनिबंध सादर केले होते. दोंडाईचा येथे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर रसायन शास्त्रात एमएस्सी केले. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला ते रसायन शास्त्राचे प्राध्यापक होते. १४ आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन पेपर प्रकाशित केले होते.
त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ पुस्तके लिहिली. सिंगापूर व युरोपला झालेल्या आंतरराष्ट्रीय व दोन राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. विविध संशोधनाच्या १८ पेटंटसाठी शासनाकडे नोंदणी केली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वॉटर संशोधन संस्थेकडून गुरुपरिषद व डी. वाय. पाटील, पुणे विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. नुकतेच त्यांना भाभा अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे ९ जुलै रोजी मलेशिया येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. प्रशांत चौधरी हे दोंडाईचा येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ओंकार चौधरी यांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात वडील प्रकाश, आजारी आई मालती,पत्नी व नऊ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.