शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कुटुंबासह समाजाचे ‘ज्येष्ठ’ उत्तम आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:18 IST

नरेशकुमार बहिरम : ज्येष्ठांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : ज्येष्ठ नागरिकांनी मोहात पडू नये. जीवन संघर्षमय आहे भविष्याचा विचार करा. उद्या आपल्याला ज्येष्ठत्वाला सामोरे जायचे आहे तेव्हाचे चित्र डोळ्यासमोर आणा. हाती आलेली संधी व संपत्ती गमावू नका. तुमच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या पंखात बळ येते. तुम्ही कुटुंबासाठी व समाजासाठी उत्तम आधारस्तंभ आहात, असे प्रतिपादन पिंपळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ.अनुराधा लोया, डॉ.जितेश चौरे, डॉ.शिरोडे, ज्येष्ठ नागरिक संघांचे सचिव शशिकांत भदाणे, के.डी. कोठावदे, सेवानीवृत्त प्राचार्य एस.वाय. गवळे, ए.पी. दशपुते, आर.एस. जोशी, रेडीओ पांझराच्या प्रतिनिधी मनीषा मरसाळे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला अध्यक्ष विमलबाई दशपुते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ए.एस. बिरारीस यांनी तर सूत्रसंचालन समुपदेशक प्रा.एस.डी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड म्हणाले की, म्हातारपण म्हणजे चहू दिशांचा अंधकार असतो.ज्याला आपले दु:ख सांगावे ते आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. वय वाढण हा निसर्गक्रम आहे. म्हणून ज्येष्ठांनी स्वत:ला अपराधी समजू नये. अशावेळी आपल्याला भक्कमपणे आधार देण्यासाठी पोलीस खाते सदैव तत्पर राहील.या वेळी डॉ.शिरोडे, के.डी. कोठावदे व शशिकांत भदाणे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची गरज काय यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए.बी. मराठे, विजय सोनवणे, भालचंद्र कोठावदे, दाशरथ मराठे, व्ही.एन. जीरेपाटील व ज्येष्ठनागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुभाष जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे