लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : तालुक्यातील कापडणे परिसरात रब्बी हंगामाच्या गहू कापणीला सुरूवात झाली आहे़ मजुर लावून कापणी केल्यास खर्च अधिक येत असल्याने हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने गहू काढला जात आहे़ त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी पंधराशे रुपये खर्च येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली़ त्यामुळे विक्रमी उत्पन्नाची शेतकऱ्यांची आशा निष्फळ ठरली़ कारण गहू पिकासाठी एका एकरला बारा हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो आणि उत्पादन मात्र केवळ आठ ते नऊ हजाराचे येणार आहे. त्यामुळे मुबलक पाण्यामुळे रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन घेण्याची शेतकºयांची आस लागून होती़ मात्र यावर निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी फिरले़ बाजारात गव्हाची आवक वाढल्याने त्याचे दर देखील घसरु लागले आहेत़ यामुळे गव्हाचे पीक देखील शेतकºयांना तोट्याचे ठरत आहे. कापडणे गावासह धनुर, सोनगीर, दापोरा, दापोरी, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद, बिलाडी, नगाव, धमाणे, देवभाने, तिसगाव ढंडाणे, वडेल आदी गावांमध्ये गव्हाचा पेरा शेकडो एकरात झालेला आहे. मात्र शेतकºयांकडे विहिरी कूपनलिकांना मुबलक पाणी असून देखील गव्हाच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या शेतकºयांनी रब्बी हंगामाच्या प्रारंभी नोव्हेंबर महिन्यामध्ये गव्हाची पेरणी केली असेल अशा शेतकºयांचे गव्हाचे पीक बºयापैकी येणार आहे. ज्या शेतकºयांनी कापसाचे पीक घेण्याच्या लालसेपायी गव्हाची उशिरा पेरणी केली त्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. यामुळे तोटा सहन करावा लागणार आहे. शेतात गहू पेरणी नंतर सव्वा ते दीड महिन्यानंतर गहू पिकांच्या हिरव्या ओंब्यावर अळयांचा, रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांनी वारंवार तण नाशकासह किटक नाशकांचीही महागडी फवारणी केली. त्यामुळे गव्हाचे पीक घेण्यात यंदा मोठा खर्च झालेला आहे़ लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : तालुक्यातील कापडणे परिसरात रब्बी हंगामाच्या गहू कापणीला सुरूवात झाली आहे़ मजुर लावून कापणी केल्यास खर्च अधिक येत असल्याने हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने गहू काढला जात आहे़ त्यासाठी शेतकºयांना एकरी पंधराशे रुपये खर्च येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली़ त्यामुळे विक्रमी उत्पन्नाची शेतकºयांची आशा निष्फळ ठरली़ कारण गहू पिकासाठी एका एकरला बारा हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो आणि उत्पादन मात्र केवळ आठ ते नऊ हजाराचे येणार आहे. त्यामुळे मुबलक पाण्यामुळे रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन घेण्याची शेतकºयांची आस लागून होती़ मात्र यावर निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी फिरले़ बाजारात गव्हाची आवक वाढल्याने त्याचे दर देखील घसरु लागले आहेत़ यामुळे गव्हाचे पीक देखील शेतकºयांना तोट्याचे ठरत आहे. कापडणे गावासह धनुर, सोनगीर, दापोरा, दापोरी, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद, बिलाडी, नगाव, धमाणे, देवभाने, तिसगाव ढंडाणे, वडेल आदी गावांमध्ये गव्हाचा पेरा शेकडो एकरात झालेला आहे. मात्र शेतकºयांकडे विहिरी कूपनलिकांना मुबलक पाणी असून देखील गव्हाच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या शेतकºयांनी रब्बी हंगामाच्या प्रारंभी नोव्हेंबर महिन्यामध्ये गव्हाची पेरणी केली असेल अशा शेतकºयांचे गव्हाचे पीक बºयापैकी येणार आहे. ज्या शेतकºयांनी कापसाचे पीक घेण्याच्या लालसेपायी गव्हाची उशिरा पेरणी केली त्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. यामुळे तोटा सहन करावा लागणार आहे. शेतात गहू पेरणी नंतर सव्वा ते दीड महिन्यानंतर गहू पिकांच्या हिरव्या ओंब्यावर अळयांचा, रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांनी वारंवार तण नाशकासह किटक नाशकांचीही महागडी फवारणी केली. त्यामुळे गव्हाचे पीक घेण्यात यंदा मोठा खर्च झालेला आहे़ लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : तालुक्यातील कापडणे परिसरात रब्बी हंगामाच्या गहू कापणीला सुरूवात झाली आहे़ मजुर लावून कापणी केल्यास खर्च अधिक येत असल्याने हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने गहू काढला जात आहे़ त्यासाठी शेतकºयांना एकरी पंधराशे रुपये खर्च येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली़ त्यामुळे विक्रमी उत्पन्नाची शेतकºयांची आशा निष्फळ ठरली़ कारण गहू पिकासाठी एका एकरला बारा हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो आणि उत्पादन मात्र केवळ आठ ते नऊ हजाराचे येणार आहे. त्यामुळे मुबलक पाण्यामुळे रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन घेण्याची शेतकºयांची आस लागून होती़ मात्र यावर निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी फिरले़ बाजारात गव्हाची आवक वाढल्याने त्याचे दर देखील घसरु लागले आहेत़ यामुळे गव्हाचे पीक देखील शेतकºयांना तोट्याचे ठरत आहे. कापडणे गावासह धनुर, सोनगीर, दापोरा, दापोरी, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद, बिलाडी, नगाव, धमाणे, देवभाने, तिसगाव ढंडाणे, वडेल आदी गावांमध्ये गव्हाचा पेरा शेकडो एकरात झालेला आहे. मात्र शेतकºयांकडे विहिरी कूपनलिकांना मुबलक पाणी असून देखील गव्हाच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या शेतकºयांनी रब्बी हंगामाच्या प्रारंभी नोव्हेंबर महिन्यामध्ये गव्हाची पेरणी केली असेल अशा शेतकºयांचे गव्हाचे पीक बºयापैकी येणार आहे. ज्या शेतकºयांनी कापसाचे पीक घेण्याच्या लालसेपायी गव्हाची उशिरा पेरणी केली त्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. यामुळे तोटा सहन करावा लागणार आहे. शेतात गहू पेरणी नंतर सव्वा ते दीड महिन्यानंतर गहू पिकांच्या हिरव्या ओंब्यावर अळयांचा, रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांनी वारंवार तण नाशकासह किटक नाशकांचीही महागडी फवारणी केली. त्यामुळे गव्हाचे पीक घेण्यात यंदा मोठा खर्च झालेला आहे़
शेतशिवारात गहू काढणीस सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:26 IST