शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक मंजुरीअभावी रस्त्यांच्या प्रस्तावाला ‘बे्रक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:16 IST

महापालिका : नगरोत्थान योजनेत ७२ रस्त्यांसाठी १६२ कोटींचा होता प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने २०१७ मध्ये ९२ रस्त्यांच्या कामांसाठी केलेला २०८ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला सादरच केला नसल्याचे समोर आले होते़ दरम्यान, ७२ रस्त्यांसाठी १६२ कोटींचा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी तो सध्या तांत्रिक मंजूरीअभावी रखडला आहे़महापालिकेने २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते व गटारींच्या कामांचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करून शासनाला प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव २० फेब्रुवारी २०१७ च्या महासभेत केला होता़ त्यानुसार प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक बनविण्याचे काम नाशिक येथील निसर्ग कन्सलटन्सी या संस्थेला देण्यात आले होते़ या संस्थेने शहरातील ९२ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २०८ कोटी ९८ लाख ९८ हजार १३३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मनपाला सादर केले़ पण त्यात एलईडी पथदिव्यांचा समावेश होता़ दरम्यान, नंतर शासनाने एलईडीच्या संदर्भात सुधारीत आदेश काढले तर या प्रस्तावातील काही रस्त्यांची कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने ती अन्य निधीतून करून घेण्यात आली़ त्यामुळे सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आला़सुधारीत प्रस्तावात ७२ रस्त्यांसाठी १६२ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले़ परंतु तांत्रिक मंजूरीअभावी हा प्रस्ताव अजूनही शासनाला सादर करण्यात आलेला नाही़ अंदाजपत्रकात दर्शविण्यात आलेल्या कामांना तांत्रिक मंजूरी घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचीच होती़परंतु संबंधित संस्थेचे १२ लाख रूपयांचे बिल थकल्याने संस्थेकडून प्रस्ताव पाठविण्याबाबत चालढकल सुरू असून प्रशासनही उदासिन असल्याचे दिसून आले आहे़ पण असे असले तरी शासनाने महापालिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्याची चर्चाही मनपा आवारात होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे