शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

करपा रोगाच्या भितीने केळी-टोमॅटो उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 22:17 IST

बभळाज परिसर : अवकाळी पाऊस; ढगाळ वातावरण; कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

बभळाज : बभळाज परिसरात रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता अवकाळी पावसाचा शिडकावा झाला असून सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल होवून ढगाळ वातावरण झाले आहे. या वातावरणाचा केळी व टोमॅटो पिकांवर अतिशय प्रतिकूल परिणाम होणार असून या वातावरणात केळी व टोमॅटो पिकांवर ‘करपा’ रोग येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केळी व टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.हवामान खात्याने दिलेल्या इशाºयानुसार येत्या ५ डिसेंबरपर्यंत असेच ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचीही शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार रविवारी पहाटे ३.४५ वाजता परिसरात पावसाने हजेरी लावली. वातावरणात अचानक झालेल्या या बदलाचा पिकांवर परिणाम होणार असला तरी या परिसरात मुख्यत्वेकरुन केळी व टोमॅटो पिकाचे मोठे क्षेत्र आहे. केळी पिकामध्ये नवती, खोडवा, तिडवा या प्रकारांचा समावेश आहे. नवती केळीची जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. त्यामुळे सदरचे पिक अधिक प्रमाणात पाच महिन्यांचे झाले आहे. तर खोडवा (दुरी), तिडवा (तिरी) या प्रकारातील केळी निसवाड झाली आहे किंवा निसवाड होत आहे. एकंदरीत केळी पिक उत्पादकांच्या दृष्टीने अगदी नाजूक टप्प्यावर आहे. त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. मात्र रविवारपासून वातावरणात झालेला बदल व आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकावर परिणाम होणार आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास केळीच्या उत्पादनात प्रचंड घट होवून शेतकऱ्यांनी नुकसान होण्याची भिती व्यक्त केली आहे.टोमॅटो पिकही लागवड करुन साधारणपणे एक महिना होत आहे. तर काही शेतकरी अद्याप लागवड करीत आहेत. बाल्यावस्थेतील या पिकाचेही रोगांपासून संरक्षण करणे शेतकºयांना अशा वातावरणात अवघड जाणार आहे. या पिकांवर जलद परिणाम करणारा व उशिराने परिणाम करणारा असे दोन प्रकारचे करपा रोग येत असतात. अशा खराब वातावरणामुळे जलद परिणाम करणारा करपा होण्याची दाट शक्यता असते. केळी पिकालाही मोठा झटका बसू शकतो, अशी प्रतिक्रिया बभळाज येथील शेतकरी जयपाल उदेसिंग राजपूत यांनी व्यक्त केली. या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास किंवा होवूच नये याकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकºयांना शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे