दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील हट्टी परिसरातील शेतकºयांनी जीवापाड प्रेम करुन केळीची बाग फुलवली. केळीची बाग चांगली सजली याचा मनोमन आनंद झाला. मात्र त्यांच्या या आनंदावर ‘कोरोना’ने विरजण घातले. उत्पन्नाचा घास तोंडावर आला असताना. स्थानिक व्यापारी बांधवांनी केळीकडे पाठ फिरवली.अतिशय कवडीमोल भावाने केळी देण्याची वेळ येथील शेतकºयांवर आली ठेपली आहे.परिसरातील अनेक शेतकºयांनी केळीची लागवड केली आहे. जादा पावसामुळे केळीचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे यंदा केळी आपल्याला चांगले उत्पादन देऊन जाईल, अशा आनंदात शेतकरी होता.मात्र कोरोनाचा कहर आता त्यांना त्रासदायक ठरत आहे. कारण त्यामुळे स्थानिक व्यापारी केळी विकत घेत नाही. दुसरीकडे केळी दुसºया जिल्ह्यात विक्रीसाठी नेणे जिल्हा बंदी व लॉकडाऊनमुळे अवघड होऊन बसले आहे.तरी जिल्हा प्रशासनाने केळी बाहेर घेऊन जाण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी मुभा द्यावी. अन्यथा तोंडी आलेला घास जाण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची प्रतिक्रीया परिसरातील शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
केळीने सजलेली बाग व्यापाऱ्यांच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:29 IST