शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात बॅक आॅफ बडोदा बॅँकेचे कामकाज तीन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:28 IST

मनपा : थकबाकीदार मालमत्तांची किंमत निश्चित झाल्यावर होणार लिलाव

ठळक मुद्देमनपाने गेल्यावर्षी कर वसुलीसाठी धडक मोहिम राबविली होती़ या मोहिमेत जवळपास १२ निवासी घरे व गाळे सील केले होते़या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर संबंधित मालमत्तांची निर्धारण किंमत ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या मालमत्तांचा लिलाव होईल, अशी माहिती उपायुक्त कदम यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांकडून वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करून धडक मोहीम सुरू केली आहे. गल्ली क्रमांक ५ येथील बॅँक आॅफ बडोदाच्या इमारतीची थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी बॅँकेला सील लावले. या कारवाईनंतर संबंधित इमारतीच्या मालकाने थकबाकीची पूर्ण रक्कम प्रशासनाकडे जमा केली. त्यानंतर हे सील काढण्यात आले. बॅँकेला सील लावल्यामुळे तब्बल तीन तास बॅँकेचा व्यवहार ठप्प होता. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. थकबाकी वसुलीसाठी मनपाची यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ताधारकांकडून वसुली करण्यासाठी तयार केलेल्या पथकात कर्मचाºयांसोबत अधिकाºयांचाही समावेश करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उपायुक्त अभिजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गल्ली क्रमांक ५ मधील बॅँक आॅफ बडोदाची शाखा  सील केली. ही बॅँक भाड्याच्या खोलीत सुरू आहे. बॅँक सील केल्यामुळे ग्राहक बॅँकेच्या बाहेर ताटकळत होते. याबाबत बॅँक इमारतीचे मालक ज्योती किशोर रिजवानी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी  दुपारी साडे बारा वाजता त्यांच्याकडे असलेली आठ लाखाची थकीत रक्कम जमा केल्यानंतर बॅँकेचे सील काढण्यात आले. त्यानंतर बॅँकेत व्यवहार सुरळीत सुरू झाले. पुढे मनपाच्या एका पथकाने रेल्वे स्टेशनरोडवरील एका गॅरेजरचे दुकान सील केले. संबंधिताकडे १  लाख ४६ हजार ८३९ रुपये थकले आहे. संबंधित गॅरेज चालकाचे नाव सुरेश राजाराम जडे आहे. तसेच वैभव नगरात  शैलेश मदाने यांच्याकडून १ लाख ७१ हजार ३४३ रुपये पथकाने वसूल केले. यावेळी  वसुली प्रमुख शिरीष जाधव, बळवंत रनाळकर, राजेंद्र ओगले आदी उपस्थित होते. वसुलीसाठी शास्ती माफी अभय योजना धुळे मनपा बाजार विभागाने मनपा हद्दीतील दुकाने, गाळे, आटे व जागा भाडे रक्कमेच्या बिलातील शास्ती रक्कमेसाठी अभय योजना लागू केली आहे. त्यात ८ फेब्रुवारी ते ९ मार्च २०१८ पर्यंत भरणा केल्यास शास्ती रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येईल. तसेच १० मार्च ते २३ मार्चच्या आत भरणा केल्यास २५ टक्के सवलत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.