शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
3
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
4
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
5
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
6
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
7
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
10
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
11
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
12
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
13
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
14
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
15
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
16
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
17
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
18
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
19
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
20
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:21 IST

जिल्हाभरात उपक्रम : शाळा, महाविद्यालयांकडून रॅली काढून आवाहन

धुळे : लोकसभेच्या गतनिवडणूकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांतर्फे रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.़विखरण शाळेतर्फे रॅलीशिरपूर-  तालुक्यातील विखरण  येथील साने गुरुजी सेमी इंग्रजी प्राथमिक, तांत्रिक, माध्यमिक व क्रांतिविरांगना लिलाताई पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.पुढील कोणत्याही निवडणुकीत १८ वर्षापुढील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन रॅलीतून करण्यात आले.मतदार जागृतीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.सनेर, स्वच्छता अभियानाबद्दल एन.पी. कापडे यांनी तर साक्षरता अभियानाबद्दल प्रल्हाद डी.सोनार यांनी मार्गदर्शन केले. व्ही.ए. पाटील, सी.एम. शिरसाठ, एस.एस. डोळे यांनी रॅलीचे संयोजन केले. पर्यवेक्षक एस.आर. पाटील यांच्या मदतीने एस.बी. विखरणकर, एस.आर. बच्छाव, प्रा.वाय.एस. सावंत, आर.पी. पवार, एस.एस. पवार, एच.ए. हिरे, आर.एम. पावरा, बी.डी. सिसोदिया, एस.एस. ईशी यांनी अभियानांसाठी सहकार्य केले.विखरण गावातील मुख्य चौकात ग्रामस्थांना एकत्रित करुन या अभियानाविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन धोंडू झिंगा पाटील, शालेय परिवहन समितीचे उपाध्यक्ष संतोष शिंदे, पालक शिक्षक संघाचे मिनाक्षी महेंद्र पाटील, राजश्री निलेश पाटील, भिमराव निंबा मराठे, अरुण नवल पाटील, वैशाली अनिल सावळे, नुतन गोरखनाथ पाटील, दगा गंगाराम पाटील, प्रविण मार्तंड पाटील यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. रॅली यशस्वीतेसाठी एम.ए. बुवा, डी.एल. ढिवरे व एम.बी. रंधे यांनी परिश्रम घेतले़देऊर येथे रॅलीधमाने- तालुक्यातील देऊर बु. येथील कॅप्टन विश्वासराव देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कै.डॉ.अस्मिता दिघावकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देऊर येथे मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी गाव दरवाजापासून रॅलीला सुरूवात झाली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोस्टर हाती घेऊन विविध घोषणा दिल्या. कार्यक्रमासाठी देवरे विद्यालयाचे प्राचार्य ए.ए. पगारे, दिघावकर विद्यालयाच्या प्राचार्या स्वरूपा देवरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.नूतन माध्यमिक विद्यालयकापडणे- नूतन माध्यमिक विद्यालयातर्फे मतदान जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक डी.पी. माळी, एस.पी. एंडाईत, ए.डी. पाटील, बी.ए. माळी, एस.सी. महाजन, व्ही.डी. शिरसाठ, के.एल. ठाकरे, पी.सी. धनगर, जी.वाय. जगताप, व्ही.आर. माळी, एल.डी. खलाणे, डी.डी. सोनवणे, आर.बी. पाडवी, एस.एस. माळी, वाय.आर. खलाणे, ए.डी. जैन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.कासारे येथे जनजागृतीकासारे- मतदान जागृतीसाठी येथील माध्यमिक विद्यालयांच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यात येथील बहुउद्देशीय विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फलक व घोषणा देत जनजागृती केली. बॅण्ड पथकासह विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. रॅलीचा समारोप बाजारपेठेत लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व प्रवाशी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. बहुउद्देशीय विद्यालयाचे मुख्याध्यापक के.डी. सोनवणे, वसंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस. बच्छाव व सर्व शिक्षक- शिक्षिकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे