ते विद्या विकास मंडळाचे सी. गो. पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री, जि. धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय साक्री तसेच रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात एड्स जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य अनंत पाटील उपस्थित होते.
नांद्रे पुढे म्हणाले की, विविध उपक्रमांचे आयोजन करून एड्स या असामान्य रोगाविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. व्याख्यानात एड्सची लक्षणे, लागण होण्याची कारणे, आजारावर मात करण्यासाठीचे विविध मार्ग इत्यादींविषयी माहिती त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दिली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी एड्स अथवा कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी जनतेत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. या जागृतीकरणाच्या कार्यात विद्यार्थ्यांनी व युवकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने त्या आजाराविषयीची योग्य माहिती, विविध बचावात्मक उपाय समाजात रुजविणे महत्त्वाचे असल्याचे मतदेखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वास भामरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन रासेयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. हसीनखाँ तडवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.