लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त तायक्वांदोपटू निरज दिलीप चौधरी आणि कोच प्रविण बोरसे यांना शनिवारी कल्याण भवनात धुळे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले़तसेच राष्ट्रीय खेळाडू समृध्दी दरवाडे, राज्यस्तरीय खेळाडू प्रेरणा जगताप, दिव्या जाधव, वृंदाराज शिरके, उन्नती चव्हाण, प्रणव नाचरे, जितू पाटील, दर्शन पाटील, अश्लेषा जोशी, आॅल इंडिया लेव्हल खेळाडू गितांजली ईशी, देवयानी मोरे, हर्षाली विसपुते, भाग्यश्री पवार, लोकेश ईशी, भैय्या कोठावदे या खेळाडूंचा देखील असोसिएनतर्फे सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला़यावेळी व्यासपीठावर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष प्रा़ रवींद्र निकम, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनिस, पोदार शाळेचे मुख्याध्यापक भुषण उपासणी, कल्याण भवनचे अध्यक्ष डॉ़ संजय पाटील, तायक्वांदो असोसिएशनचे कार्याध्यक्ष ओम खंडेलवाल, सचिव हेमंत कुलकर्णी, उपाध्यक्ष अतुल दहिवेलकर, सहसचिव प्रकाश मंडाले, खजिनदार भुपेंद्र मालपुरे, उपाध्यक्ष तनय पंडीत, सदस्य राजेंद्र बारे, मुकूंद दरवडे, संजय जमदाडे, प्रा़ विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ सूत्रसंचालन श्रीकांत कुलकर्णी यांनी केले तर हेमंत कुलकर्णी यांनी आभार मानले़
पुरस्कारप्राप्त क्रिडापटूंचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:23 IST