शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

घरकुलांसाठी मनपाला केंद्राच्या निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:37 IST

लाभार्थी चिंतेत : सत्ताबदलानंतर राज्याचा निधी मिळाला,मात्र चार महिन्यापासून केंद्राचा निधीच मिळाला नाही

धुळे : पंतप्रधान घरकूल योजनेतील ५०४ लाभार्थ्यांनी मनपाकडे प्रस्ताव सादर केले होते़ त्यापैकी १५४ घरकुलाच्या लाभार्थ्यांना केद्र व राज्य शासनाकडून तिसऱ्या टप्प्याचे १ कोटी १८ लाख रूपये अनुदान देण्यात आले आहे़ दरम्यान सत्ता परिवर्तनानंतरही राज्याकडून मिळणारा घरकुलाचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे़ मात्र चार महिन्यापासुन केंद्र सरकारच्या निधीची प्रतीक्षा आहे.प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर हक्काचे घर किंवा विस्तारासाठी अडीच लाखांपर्यत अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून सहा टप्यात देण्यात येते़ दरम्यान या योजनेसाठी महापालिका क्षेत्रातील ५०४ घरकुल लाभार्थ्यांनी २०१९-२०२० मध्ये प्रस्ताव सादर केले होते़ त्यापैकी १५४ लाभार्थी पात्र लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे़ मंजूर मिळालेल्या लाभार्थ्यांना केंद्राचा ६० हजार तर राज्याचा ४० असा एक लाखांचे अनुदान पहिल्या टप्यात कामांच्या स्वरूपानुसार देण्यात आले़ त्यासाठी प्रत्येक घरकूल बांधकामांची पाहणी करून शासनाकडे कामाचा अहवाल पाठविण्यात येतो़लाभार्थ्यांकडून माहिती सादरशहरातील घरकूल लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या जुन्या इमारतील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे़घरकूल प्रकरणे मंजूर झाल्यांनतर लाभार्थ्यांंकडून आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली जात आहे़ लाभार्थ्यांनी बांधकाम आराखडे सादर केल्यानंतर कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ आतापर्यत शहरात १५४ घरकुलांची कामे सुरू आहेत़ चार ते पाच महिन्यात कामे पुर्णत्वास येतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे़लाभार्थ्यांना हप्याची प्रतीक्षापंतप्रधान घरकूल योजनेसाठी शहरातील ८५० लाभार्थ्यांनी सुरूवातीला प्रस्ताव सादर केले आहे़ त्यापैकी ५०४ लाभार्थ्यांचे शासनाकडे डीपीआर सादर झाला होता़ त्यापैकी प्रत्यक्षा १५४ घरकुलांचे कामे सुरू आहे़ घरकुलाच्या बांधकामानुसार आतापर्यत तिसºया टप्यातील निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे़जागेचा प्रश्न सुटणारस्वमालकीची जागा नसल्याने शहरातील बहूसंख्य कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. यातील बहुतांशी कुटुंबे वर्षानुवर्षे सरकारी जागेवर राहत आहेत. परंतु, या कुटुंबांकडे जागेचा मालकी हक्क नसल्याने हक्काचे घर मिळण्यास मोठी अडचण दूर होणार आहे. आता गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध होणारआहे. त्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.माहिती संकलन सुरूअतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी ग्रामपंचायत व महापालिका हद्दितील अतिक्रमण धारकांची माहिती जमा करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे़ सध्या शहरात ३९ शासकीय जागेवर (घोषित झोपड्या) आहेत़ तर १९ अघोषित झोपड्या, ७ फुटपाथवरील झोपडपट्या, ६० कॉलनी, नगर व विविध भागातील झोपडपट्या आदी माहिती संकलित केली जात आहे.शासकीय जागेचे सर्वेक्षण पुर्णशहरातील जुनी भिलाटी, विष्णू नगर,जमणागिरी भिलाटी, मोगलाई मशिद, भीम नगर, यशवंत नगर, शनि नगर, साईबाबा नगर, फाशीपुल, पिराची टेकडी मोहाडी, नगावबारी, चक्करबर्डी, कदमबांडे नगर देवपूर, शाळा कं्र. २ जुने धुळे, गायकवाड चौक, गांधी पुतळा जवळ पाटासमोर, संगम हॉटेलजवळ पाटावर अशा सुमारे १३५ झोपड्यापैकी ६ हजार लाभार्थ्याचे सर्वेक्षण केले आहे़त्या जागेला विरोधशहरातील मिल परिसरात खाजगी मालकाच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून नागरिक राहत आहे़ त्या जागा रहिवाशांच्या नावे करण्यासाठी महासभेत ठराव झाला आहे़मात्र सदरील जागेचा वाद सुरू असल्याने सर्वेक्षण करण्यासाठी ठेकेदारास विरोध होत असल्याने काही दिवसापासून त्या ठेकेदाराने सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे