शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी

By admin | Updated: July 9, 2017 01:12 IST

पिंपळनेर : हवामानाची योग्य माहिती शेतकºयांना त्वरित मिळणार, १५ कि.मी. अंतरातील माहिती संकलित होणार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : शासनाच्या कृषी विभागातर्फे पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. या केंद्राद्वारे शेतकºयांना हवामानाची अद्ययावत माहिती मिळणे आता शक्य होणार आहे. महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र हे राज्य शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या  खासगी भागीदारीतून  कृषी विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. यासाठी ‘वेध हवामानाचा, ध्यास शेतकरी कल्याणाचा’ या ब्रीद वाक्याप्रमाणे या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून ५ गोष्टींची माहिती शेतकºयांना मिळणार आहे.  यात पाऊस, हवेची दिशा, हवेची गती, तापमान व आर्द्रता यांची प्रत्येक तासागणीक माहिती महावेधच्या पुणे, मुंबई, नोएडा येथील कार्यालयांना  प्राप्त होईल. या माहितीमुळे पिंपळनेरसह परिसरातील स्थानिक शेतकºयांनाही त्याचा फायदा होणार आहे.   महावेध स्वयंचलित हवामान केंद्र सुरू होऊन या भागातील माहिती संकलित करण्याचे कामही सुरू झाले आहे. या हवामान केंद्राला पर्जन्यमापक (रेन गेज) बसविण्यात आले असून किती पाऊस झाला, ही माहितीही कळणार आहे. हवामान केंद्राला जीपीआरएस सिस्टिम असून यासंदर्भातील सर्व माहिती संकलित होऊन मुख्यालयास वेळ निश्चित केल्यानुसार कळणार आहे. या केंद्रात बॅटरी चार्जिंगसाठी सोलर प्लेट बसविण्यात आली आहे, तसेच एरिअलने जीपीआरएस सिस्टिमला देण्यात आला आहे. सर्वात उंचावर अल्ट्रासॉनिक बसविण्यात आले आहे. यामुळे हवेची दिशा व गती त्याचबरोबर तापमान व आर्द्रता कळणार आहे. सदर हवामान केंद्र हे आतापर्यंत पिंपळनेर, दहिवेल, देवजीपाडा, कुडाशी, कासारे, उंभरपाटा, जैताणे येथे बसविण्यात आले असून साक्रीतही हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे हवामान केंद्र स्थापनेचे काम सन्नी सिंग, विलास गोपाल यांच्यासह युवराज चौधरी यांनी केले. दोन महिन्यापूर्वी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पिंपळनेर येथे  एका  कार्यक्रमाप्रसंगी आले होते. त्यांनी शेतकºयांना हवामानाची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण राज्यात अंदाजे २ हजारांपेक्षाही जास्त हवामान केंद्रांची उभारणी राज्य सरकारतर्फे केली जाणार असल्याची घोषणा केली होती.