लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : औरंगाबादेमधील एका गुन्ह्यातील एका आरोपीला औरंगाबाद पोलीस पथकाने सोमवारी रात्री धुळे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. परतीच्या प्रवासात या आरोपीने धावत्या वाहनाचे स्टेअरिंग फिरवून अपघात घडविला. त्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सादिक शेख नुरअहमद शेख (३४, रा़ मौलवीगंज, धुळे) असे या आरोपीचे नाव असून, तो औरंगाबाद येथील एका गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव क्रॉसिंगजवळ औरंगाबाद पोलिसांच्या पथकाला तो दिसला. चाळीसगाव रोड पोलिसाच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.
औरंगाबादच्या गुन्ह्यातील आरोपीला धुळ्यात अटक
By admin | Updated: July 5, 2017 03:51 IST