शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आॅडिटमुळे लहान पुलाची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:06 IST

मनपा स्थायी समिती : अजेंड्यावरील खर्चाचा एक विषय ठेवला तहकूब

धुळे : शहरातील लहान पुलाचे आॅडीट कधी होणार? असा सवाल उपस्थित करत त्याअभावी वर्दळ थांबल्याने नागरीकांचे हाल होत असल्याची ओरड स्थायी समितीच्या सभेत सदस्यांकडून झाली़ पाईप लाईन व नवीन व्हॉल्व टाकण्याचा विषय तहकूब ठेवत अन्य विषय मंजूर झाले़   महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची सभा पार पडली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ तसेच सदस्या लक्ष्मी बागुल व्यतिरिक्त विमलबाई पाटील, सुनील सोनार, नागसेन बोरसे, रावसाहेब पाटील, संतोष खताळ, सुरेखा उगले, सुरेखा देवरे, कशीश उदासी, संजय भील, मुक्तार मन्सुरी, शेख शाहजहान बी बिस्मिल्ला, सुभाष जगताप, अन्सारी सईदा म़ इकबाल, अमीन पटेल उपस्थित होते़ लहान पुलाच्या आॅडीटबद्दल सभेत विषय निघाल्यानंतर अभियंता कैलास शिंदे यांनी सांगितले, १९६४-६५ मध्ये लहान पुलाची निर्मिती झाली़ त्याला बराच काळ झाल्याने पुल जिर्ण झाला आहे़ अतिवृष्टी झाल्याने पुल खराब झाला़ परिणामी वर्दळीसाठी तो बंद करण्यात आला़ दुरुस्तीसंदर्भात निविदा काढण्यात आली आहे़ लवकरच काम मार्गी लावले जाईल़ विविध पातळीवर पुलाची तपासणी केली जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले़ स्वच्छता आणि शौचालयाच्या साफसफाईप्रकरणी ठेकेदाराची मनमानी सुरु असून बोगस कामगार, कर्मचारी दाखवून बिले काढून घेऊन ठेकेदार महापालिकेला चूना लावत असल्याचा आरोप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केला़ यावर चंद्रकांत जाधव यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणी चौकशी केली जाईल असे उपायुक्त गोसावी यांनी सांगितले़ अमीन पटेल यांनी शाळा आणि त्यातील सुविधांचा मुद्दा उपस्थित केला़ काही शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ स्वच्छता नाही़ शिकविण्याची वाणवा असल्यामुळे विद्यार्थी महापालिकेच्या शाळा सोडून जात असल्याचा आरोप केला़ यावर शिक्षण विभागाचे     प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी हा मुद्दा खोडून काढला़ असा काहीही प्रकार नसल्याचे ठासून सांगत १५० च्यावर विद्यार्थी काही शाळांमध्ये असल्याचे सांगितले़ दरम्यान, धुळे शहरातील विविध ठिकाणी पाईप लाईन दुरुस्त व नवीन व्हॉल्व टाकण्याचे काम करुन घेण्यात आले़ त्यासाठी लागणाºया खर्चास मंजूरीचा विषय चर्चेअंती तहकूब ठेवण्याचा आदेश सभापती यांनी दिला़ 

टॅग्स :Dhuleधुळे