शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचा-यांनी मुंडण करत वेधले प्रलंबित मागण्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:06 IST

सेवानिवृत्त कर्मचा-यांचा संताप : ईपीएफओ संस्थेचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पुतळयाचा दशक्रिया विधी

ठळक मुद्देई.पी.एफ.ओ.ने जारी केलेली ३१ मे २०१७ रोजीची अंतरिम अ‍ॅडव्हायजरी मागे घेऊन सेवानिवृत्तांना पगाराच्या प्रमाणात उच्च पेन्शन बाबतचा पर्याय खुला करावा. तसेच २३ मार्च २०१७ च्या पत्रानुसार पेन्शन प्रश्नी कार्यवाही करावी. कमीत कमी ७,५०० मूळ पेन्शन देऊन पेन्शन महागाई भत्याशी निगडित करावी. ईपीएस-९५ पेन्शन योजनेंतर्गत जे सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनला पात्र ठरले नाहीत. पण विविध संस्थातून ज्यांनी पूर्ण सेवा दिली आहे. अशा कर्मचाºयांना सामावून घ्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशभरातील विविध आस्थापनातील ईपीएस-९५ योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी बुधवारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करीत निषेध व्यक्त केला. सेवानिवृत्त्त कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, सेवानिवृत्तांच्या मागण्या सुटत नसल्याने सेवानिवृत्त ई.पी.एफ.ओ’ संस्थेचा निषेध करत या संस्थेचा दशक्रिया विधीही केला. ईपीएस-९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की ई.पी.एफ.ओ (एम्लॉईज प्राव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन, नवी दिल्ली) ही देशपातळीवरील मध्यवर्ती संस्था आहे. ही सेवानिवृत्तांसाठी ‘मातृसंस्था’ आहे.  परंतु सद्य:स्थितीत या संस्थेचे नियामक व नियंकत्रक यांनी पेन्शनर्स संबंधी एक प्रकारे अमानवी, निर्दयी, क्लेषकारक, अवहेलना उठवून लावण्याचे षडयंत्र उभे केले आहे. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत आहे. या वेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, एस.टी. महामंडळ संघटनेचे अध्यक्ष वाय. जी. राजपूत, वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. जी. धिवरे, सीटू संघटनेचे कॉम्रेड एल. आर. राव, एस.टी महामंडळ सीटू संघटनेचे नेत पोपटराव चौधरी राष्टÑीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र एरडावकर, विजय येवलेकर, के. डी. गिरासे, वाय. पी. पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव आदी उपस्थित होते. आयुष्य सुखकर होणारे निर्णय घ्या!सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून ई.पी.एफ.ओ.ने वृद्ध व ज्येष्ठ नागरिक पेन्शनर्सना उर्वरित आयुष्य सुखकर कसे होईल? या दृष्टीने  निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे. ३० ते ३५ वर्ष सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सेवा दिली आहे. या बाबीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा; अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी ई.पी.एफ.ओ या संस्थेचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संस्थेचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचा  दशक्रिया विधी करण्यात आला. या विधीनंतर सेवानिवृत्त महिला कर्मचाºयांनी या पुतळयाला जोडव्याने मारले. 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी