लोकमत न्यूज नेटवर्कतºहाडी : वरुळ येथील आर.सी. पटेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यावेळी बक्षीस वितरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यात कतृत्ववान स्त्रीयांवर आधारीत कार्यक्रम आकर्षण ठरले.याप्रसंगी शाळेचे चेअरमन प्रसन्न जैन, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा , केंद्र प्रमुख एम.एस. सूर्यवंशी, बाजार समितीचे उपसभापती इशेंद्र कोळी, जि.प. सदस्य भीमराव ईशी, सरपंच जयश्री धनगर, पप्पू पाटील, नरेंद्र मराठे, कैलास भामरे, गणेश भामरे, जितेंद्र भोई, महेश पाटील, ओंकार पाटील, प्रकाश गुरव, सुनील धनगर, रावसाहेब चव्हाण, मंगलसिंग पावरा, राजेंद्र जाधव तसेच संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख त्यात ज्युली थॉमस , स्मिता पंचभाई , सिल्विया जानवे व परिसरातील सर्व पालकवर्ग मोठ्या उपस्थित संख्येने होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ जानवे यांनी प्रास्ताविकेतून शाळेत होत असलेले विविध उपक्रम व शाळेचा उंचावत जाणारा आलेख सर्वांसमोर सादर केला.आंतर शालेय स्पर्धांमध्ये तसेच आॅलंपीयाड परीक्षेत मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. यावेळी पाटील तनिश दत्तात्रय याला मास्टर आॅफ आरसीपी वरूळ व पाटील हेमांगी शरद हिला मिस आॅफ आरसीपी वरूळ हा पुरस्कार देण्यात आला.याशिवाय महिलांसाठी व पुरुषांसाठी झालेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली. डॉ.उमेश शर्मा व प्रसन्न जैन यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व आपले विचार व्यक्त केले. यानंतर स्त्री शक्ती या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांवर आधारित कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्तृत्ववान कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज चित्ते, शामकांत पवार, सपना मराठे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी किरण वाघ, लोकेश बोरसे, मयूर वाणी, प्रशांत सावळे, रुपाली पाटील, ममता पाटील, मोनाली बोरगांवकर, भाग्यश्री चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी दिली दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:52 IST