शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार न्यायालयात हजर रहा, जि़प़ च्या सीईओंना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:33 IST

कामगार न्यायालय - प्रभावीपणे झाला युक्तीवाद

धुळे : न्यायालयाच्या आदेशाचा अनादर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी व्यक्तीश: हजर आदेश कामगार न्यायालयाने पारीत केले आहे़ याकामी अ‍ॅड़ सुभाष पाटील यांनी युक्तीवाद केला़ त्यांना अ‍ॅड़चैतन्य बर्गे यांनी मदत केली़येथील कामगार न्यायालयाने सतीष दिपचंद पाटील आणि दिलीप मंगा शिंदे या निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, गट विकास अधिकारी यांच्या विरुध्द प्रोसेस इश्यु करण्याचा नुकताच आदेश पारीत केला आहे़ पाटील आणि शिंदे हे दोन्ही सेवक जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होतेवेळी त्यांना नोकरीच्या काळात दिलेल्या वेतनवाढीचा लाभ शासन निर्णयाच्या आधारे जिल्हा परिषदेने काढून घेऊन त्यांच्या वेतनात घट केली़ त्यानुसार निवृत्तीचे फायदे लागू करण्यात आले़ तथापी ही कारवाई कामगार कायद्यातील तरतुदींचा भंग करणारी असल्यामुळे या दोघांनी धुळ्यातील औद्योगिक न्यायालयात अनुचित कामगार प्रथेच्या तक्रारी दाखल केल्या़ या तक्रारींचा गुणवत्तेवर न्यायनिवाडा करुन न्यायालयाने दोघांच्या तक्रारी मंजूर केल्या़ त्यांचे वेतन पुर्ववत करुन मागील थकीत वेतनाची भरपाई करुन देण्याचा आदेश पारीत केला़ मात्र, या निकालाप्रमाणे जिल्हा परिषदेने अंमलबजावणी करण्यास कसूर केला़ म्हणून या दोघांनी औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन केलेल्या गुन्ह्याविरुध्द धुळ्यातील कामगार न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली़या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या औद्योगिक न्यायालयातील तक्रारीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व गट विकास अधिकारी यांना प्रतिवादी म्हणून सामील केले होते़ त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अनादर केल्यामुळे त्यांच्या विरोधात कामगार न्यायालयाने प्रोसेस इश्युचा आदेश पारीत केलेला आहे़या कामी आरोपीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी़, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्र घोरपडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्षा घुगरे, शिंदखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुरेश शिवदे यांचा समावेश आहे़ या सर्वांना २३ जानेवारी २०२० रोजी न्यायालयात व्यक्तीश: हजर राहण्यासाठी न्यायालयाने समन्सची बजावणी केलेली आहे़ यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे़ याकामी फिर्यादीतर्फे अ‍ॅड़ सुभाष बी़ पाटील यांनी युक्तीवाद केला़ त्यांना चैतन्य बर्गे यांनी मदत केली आहे़

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय