शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

पोलिस प्रशासनाचा प्रयत्न : नाविण्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद, संवेदनशील भागाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:24 IST

सीसीटीव्ही कॅमेराची अद्यापही प्रतीक्षा!

ठळक मुद्देशहरात २४२ तर ग्रामीण भागात ११६ या पध्दतीने कॅमेरे बसविण्यात येणार आहे़ त्यात सर्व प्रमुख शासकीय कार्यालये तसेच कमलाबाई शाळा, पालेशा महाविद्यालय, जिजामाता हायस्कूल, जेआरसीट, न्यू सिटी व नुतन पाडवी हायस्कूल, या शिवाय सर्व मुख्य चौक, मंदिरे येथे कॅमेरे बसशहरासह जिल्ह्यात नेहमी मोर्चे, धरणे व रास्तारोको आंदोलने होतात़ तसेच रॅली, सभा, मिरवणुकाही असतात़ अशावेळी त्याचे कव्हरेज करण्यासाठी पोलीस वाहनांवर मुव्हेबल कॅमेरे आवश्यक आहे़ त्यात शहर, आझादनगर, देवपूर, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथील पोलीस वाहनांवर कॅमेरवाहनांवर कॅमेरे बसविल्यास संशयितांवर वचक बसण्यास मदत होणार आहे. कॅमेरे बसविल्यास त्याद्वारे मिळणाºया फुटेजमधून गुन्हेगारांचा शोध लागण्यास मदत होणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी १ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय  मंजूरी दिली होती़ तो प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला़ मात्र दोन वर्ष उलटूनही प्रस्ताव गृहविभागाकडे पडुन आहे़ गृह विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडून जीआर काढण्यात येईल़ त्यानंतर अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका पोलिस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी व्यक्त केली आहे़ शहरात ६ पोलीस ठाणे आहे़ त्यात शहर अतिसंवेदनशील म्हणूून ओळखले जाते़ धुळे शहरात किरकोळ कारणाचेही पर्यवसान दंगल, दगडफेकीत होते़ अशाच काही कारणावरून २००८ व २०१३ मध्ये शहरात दोन गटांत दंगल घडली होती़ त्यात जीवित व वित्त हानी झाली होती़ तसेच जिल्ह्यात विविध सणोत्सव उत्साहात साजरे होत असतात़ अशा वेळी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत असतात़ अशा वेळी काही कारणावरून वाद झाला तर त्याचे हाणामारीत रूपांतर होते़ त्यामुळे नागरिकांची धावपळ होते़ अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ तो निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास गुन्हेगारांवर जरब बसविणे शक्य होणार आहे़ अशा विश्वासही पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे़  तसेच चोरी, चेनस्रॅचिंग, महिलांची छेड, हाणामारीच्या घटना रोखण्यासही पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत होणार आहे़  जिल्हा नियोजन व विकास समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस विभागाने जिल्हाधिकाºयांना १५ जून २०१४ रोजी दिला होता़ मात्र तो अनेक महिने पडून होता़ त्यानंतर नव्याने रूजु झालेले जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी मे महिन्यात शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी १ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली़ मात्र गृह विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही़ हा प्रस्ताव गृहविभागाकडे पडून आहे़ सदर पत्र प्राप्त होताच शहरातील मुख्य चौक, रस्ते व संवेदनशील भागांचे सर्व्हेक्षण करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत़ शिवाय या कॅमेºयांचे फुटेज पाहण्यासाठी २४ तास कंट्रोल रूमही सुरू केला जाणार आहे़ शहरतील सर्व्हेक्षणानंतर सीसीटीव्हींच्या संख्येबाबत निर्णय घेतला जाणार आहेत़ दरम्यान, शासनाकडून जीआर प्रसिध्द झाल्यानंतर अंमलबजावणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले़ हा प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा असल्याचे एम़ रामकुमार म्हणाले़ 

शहरासह ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी राज्याच्या गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे़ शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतरच पुर्तता केली जाईल़ - एम़ रामकुमार, पोलीस अधीक्षक़