शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांविरूध्द राष्ट्रवादी काँगे्रसची धुळयात हल्लाबोल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:19 IST

सरकारचा पाठिंबा काढण्याच्या धमक्यांचे शिवसेनेचे शतक-सुनील तटकरे

ठळक मुद्दे-राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फागणे ते अमळनेर हल्लाबोल यात्रा-सरकारच्या धोरणांवर सुनील तटकरे यांचे पत्रकार परिषदेत टिकास्त्र-धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण विधानसभेत उपस्थित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य सरकारचे धोरण सर्व बाबतीत कुचकामी ठरले असल्याने त्यांना जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळण करून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा देखावा करावा लागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली़ त्यानंतर सरकारी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे फागणे ते अमळनेर हल्लाबोल यात्रा काढण्यात आली़शिवजयंतीनिमित्त फागणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर हल्लाबोल यात्रेस प्रारंभ झाला़ या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ हे सहभागी झाले़ हल्लाबोल यात्रेला ढोलतांशाच्या गजरात फागणे येथून शुभारंभ झाला. ही यात्रा अमळनेरकडे मार्गस्थ झाली़ हल्लाबोल यात्रा व शिवजयंतीचे औचित्य साधत दुचाकींवर राष्ट्रवादीच्या झेंड्यासह भगवे ध्वज लावून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ तत्पूर्वी धुळयातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला़ तसेच शिवसेनेवरही त्यांनी हल्लाबोल केला़ उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्यांचे शतक केल्याचे ते म्हणाले़ विधानसभेत धर्मा पाटील आत्महत्या, भूसंपादनातील गोंधळ व अनुषंगिक विषय उपस्थित करणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले़ डॉ़ हेमंत देशमुख यांच्याविरूध्द दाखल गुन्ह्याच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले़