कोरोना महामारीमुळे खासगी प्रवासी वाहने बंद आहेत. या वाहनांचा वापर शेतात मजूर घेऊन जाण्यासाठी होतो; मात्र धमाणे शेतरस्ता अत्यंत खराब झाल्याने मजूर वाहतूक बंद झाली होती. शेत माल बाजारपेठेत घेऊन जाणेदेखील कठीण झाले होते.
माजी कृषी सभापती रामकृष्ण खलाने यांनी ३०५४ योजनेंतर्गत रस्ता डांबरीकरण केले आहे. खलाने यांनी डांबरीकरण रस्त्याच्या कामाची स्वतः शेतकऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या इतर समस्या जाणून घेतल्या. न्याहळोद कापडणे रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेत तयार करू, असे सांगितले. यावेळी अमित पवार, बाबा कोळी, पं. स. सदस्य विकास पवार, कौठळ सरपंच बुधा मोरे, ग्रा.पं.सदस्य नामदेव रोकडे, सुनील पुराणिक, सुनील कढरे, धर्मा वाघ, अनिल वाघ, विजय माळी, लोटन माळी, बारकू जिरे, सुनील चौधरी, निंबा माळी, अमोल वाघ, कैलास माळी, संदीप रोकडे, कैलास रोकडे, गणेश पाटील, पिंटू जिरे आदी शेतकरी उपस्थित होते.