शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अरविंद इनामदारांचे होते धुळ्याशी ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:54 IST

१९७१ मध्ये गाजविले होते दिवस : पोलीस अधीक्षक पदाचा दरारा आजही स्मरणात

धुळे : धुळ्याचे तत्कालिन पोलीस अधीक्षक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे धुळ्याशी, इथल्या मातीशी ऋणानुबंध होते़ माजी आमदार पी़ डी़ दलाल यांचे स्रेही असलेले  इनामदार  यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ नोव्हेंबर २०१५ रोजी दलाल यांचा झालेला सन्मान आजही अनेकांच्या स्मरणात राहिलेला आहे़ शहरातील स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने कमलाबाई हायस्कूल येथे माजी आमदार प्रा. पी. डी़ दलाल यांनी शिक्षण क्षेत्रासाठी व समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त      अरविंद इनामदार धुळ्यात आले होते. त्या वेळी त्यांनी धुळ्यातील त्यांच्या पोलीस अधीक्षक पदाच्या  कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला होता़ त्याकाळी अरविंद इनामदार यांचे नाव काढताच गुंडांच्या छातीत     अक्षरश: धडकी भरायची, असे जुन्या निवृत्त झालेल्या पोलीस  कर्मचाºयांकडून सांगण्यात आले़ इनामदार यांनी धुळ्यात ११ जून १९७१ ते २३ मार्च १९७२ या कालावधीत धुळ्यात ५० वे पोलीस अधीक्षक या महत्वाच्या पदावर कार्यरत होते़ त्या काळी गुंडावर मोठी जरब त्यांनी बसविली होती़ कुठेही कारवाई करीत असताना त्यांनी कोणाचाही मुलाईजा बाळगला नव्हता़ थेट स्वत: जावून त्यांनी कारवाईचे सत्र अवलंबिले होते़ त्याकाळी डबल सीट बसून सायकल चालविण्याची परवानगी नव्हती, सायकलीला लाईट नसेल तरी कारवाई होत होती़ सायकलीवर डबलसीट जातांना कोणी आढळले तर इनामदार हे त्यांना पकडायचे आणि एक तर त्यांच्या सायकलीची हवा  काढून घ्यायचे नाहीतर सायकल चालविणाºयाची टकली करायचे़ एकंदरीत पाहता जागेवरच शिक्षा देण्याचा त्यांचा फंडा अनेकांना घाबरुन सोडायचा़ पोलिसांना कामाच्या तुलनेत खूप कमी वेतन दिले जाते. पोलिसांचा दर्जा सुधारण्यासाठी महसूल विभागाप्रमाणे पोलिसांच्या वेतनश्रेणीत वाढ केली पाहिजे. दहशतवादासारख्या प्रश्नाचा मुकाबला हा सर्व देशांनी मिळून करावा लागेल असे त्यांना वाटत होते़ 

धुळ्यातील बसस्थानकासमोर पोलीस प्रशासनाचे नवे मैदान तयार करण्याचा विषय पटलावर आला होता़ मैदान करीत असताना त्या ठिकाणी निंबाचे झाड असावे, जेणे करुन येणाºया जाणाºयांना सावलीचा आधार मिळू शकेल़ त्यावर शिक्कामोर्तब झाला आणि आजच्या स्थितीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानालगत इनामदार यांच्या हस्ते लावण्यात आलेले त्या काळातील छोटेसे रोपटे आजच्या स्थितीत वटवृक्षात रुपांतर झाले आहेत़ त्यानिमित्त त्यांची आठवण ताजीच आहे़  

टॅग्स :Dhuleधुळे