शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात ढोलताशांच्या निनादात ‘श्रीं’चे जल्लोषात आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 14:38 IST

बाजारपेठेत गर्दी उसळली, शहरात उत्साहाचे वातावरण

ठळक मुद्देसकाळपासूनच मूर्ती खरेदणाºयांची झाली गर्दीढोलताशांच्या आवाजाने शहर निनादलेबाजारपेठेत लाखोंची उलाढाल

आॅनलाईन लोकमतधुळे - ढोलताशांचा निनाद... गुलालाची उधळण.... व गणपती बाप्पा मोरया.... अशा गगनभेदी घोषणा देत गुरूवारी शहरासह जिल्ह्यात  अपूर्व उत्साहात विघ्नहर्ता गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. ‘श्री’च्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली होती. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात येत होती. गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.   शहरातील विविध भागात मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. त्यामुळे गणेशोत्सवाची वातावरण निर्मिती दोन दिवसांपूर्वीच झालेली होती. गुरूवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या.धुळे शहरात संतोषी माता चौक ते कमलाबाई कन्या हायस्कुलपर्यंतच्या रस्त्यावर आणि आग्रारोडवर महात्मा गांधी चौक ते पारोळा रोडवर सिग्नल चौकापर्यत जुन्याआग्रारोडवर दुतर्फा मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती. त्याचबरोबर पुजेचे साहित्याचीही लहान-लहान दुकाने लावण्यात आलेली होती. घरोघरी ‘श्रीं’ची स्थापना होत असल्याने, नागरिक कुटुंबातील सदस्य, चिमुकल्यांसह बाजारपेठेत दाखल झाले होते. स्वत:सोबतच लहानग्यांना पसंत पडणारी मूर्ती खरेदीला प्राधान्य देण्यात येत होते.  आग्रारोड, साक्रीरोडवर ढोल व ताशांची पथके सज्ज होती. संध्याकाळपर्यत गणेशमूर्तीची खरेदी होताच ती स्थापनेच्या ठिकाणी नेण्यासाठी ढोलताशांच्या निनादात लगबग सुरू व्हायची. तरूण कार्यकर्ते नृत्य करीत, तसेच गुलालाची उधळण करीत श्रींच्या मूर्तीसह मार्गस्थ होत होते.बाजारपेठेत प्रचंड गर्दी- मूर्ती व पूजेचे साहित्य खरीदण्यासाठी अनेकजण बाजारपेठेत दाखल झाल्याने, फुलवाला चौक, संतोषी माता परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले होते.या परिसरात चालायलाही जागा नव्हती. भाद्रपदाचे कडक उन्ह असतांनाही गणेशभक्तांचा उत्साह तुसभरही कमी झालेला नव्हता. काहींनी पारंपारिक वाद्य वाजवित तर काहींनी मोठे वाद्य लावून गणरायाला वाजतगाजत मंडपात नेले. 

टॅग्स :Dhuleधुळे