शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ढोलताशांच्या निनादात ‘विघ्नहर्त्या’चे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:51 IST

सर्वत्र चैतन्याचे वातावरण : सकाळपासूनच मूर्ती खरेदीसाठी गर्दी, लाखोंची उलाढाल, मिरवणुकांमुळे उत्साहाला उधाण

धुळे : ढोलताशांचा निनाद... गुलाल व फुलाची उधळण  व गणपती बाप्पा मोरया.... अशा गगनभेदी घोषणा देत महाराष्टÑाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायांचे सोमवारी गणेश चतुर्थीच्या महूर्तावर जल्लोषात आमगन झाले.  ‘श्री’च्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली होती. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत होती. गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून, पीक स्थिती बरोबरच पाणी टंचाईचीही समस्या सुटली आहे. सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचाही सर्वत्र उत्साह आहे. श्रावण महिना सुरू होताच  गणरायाच्या आगमनाची चाहूल लागलेली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मोठ-मोठ्या सार्वजनिक मंडळांतर्फे मंडप उभारणी, आरासचे काम सुरू होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू होते. सर्वांनाच प्रतीक्षा होती ती ‘श्रीं’च्या आगमनाची. गणरायाच्या स्वागतासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच बाजारपेठ सजली होती. शहरातील विविध भागात मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. त्यामुळे गणेशोत्सवाची वातावरण निर्मिती झालेली होती. सोमवारी  सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या. जसजशी वेळ वाढत होती, तसतशी बाजारात गर्दी वाढत होती. धुळे शहरात संतोषी माता चौक ते कमलाबाई कन्या हायस्कुल पर्यंतच्या रस्त्यावर तसेच फुलवाला चौक,  जुन्या आग्रारोडवर महात्मा गांधी चौक ते पारोळा रोडवर सिग्नल चौकापर्यत रस्त्याच्या  दुतर्फा मूर्ती तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती. त्यामुळे या रस्त्यांवर चालायलाही जागा नव्हती. गणेश भक्तांच्या गर्दीमुळे रस्ते फुलून गेले होते. ढोलताशांच्या निनादाने शहर दणाणलेजुन्या आग्रारोडवर ढोलताशांची पथके सज्ज होती. गणेशमूर्तीची खरेदी होताच ती स्थापनेच्या ठिकाणी नेण्यासाठी ढोलताशांच्या निनादात लगबग सुरू व्हायची. तरूण कार्यकर्ते नृत्य करीत, तसेच गुलाल व फुलांची उधळण करत श्रींच्या मूर्तीसह मार्गस्थ होत होते.बाजारपेठेला आले यात्रेचे स्वरूप मूर्ती व पूजेचे साहित्य खरिदण्यासाठी अनेकजण परिवारासह बाजारपेठेत दाखल झाल्याने, फुलवाला चौक, संतोषी माता चौक, जुना आग्रारोडला यात्रेचे स्वरूप आलेले होते. बाजारपेठेत गर्दी असली तरी गणेशभक्तांचा उत्साह तुसभरही कमी झालेला नव्हता.  या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते. मोठ्या मूर्तींनी लक्षवेधले  सहजीवननगरातील जयभोले मित्र मंडळसह विविध  मंडळांच्या मोठ्या मूर्ती ट्रॅक्टरवर नेण्यात आल्या. या भव्य मूर्तींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. पुरोहितांची लगबग अनेक ठिकाणी विधीवत पूजा करूनच श्रींची स्थापना करण्यात आली. एकेका पुरोहितांकडे अनेक मंडळाच्या श्रींच्या स्थापनेचे काम असल्याने, त्यांना धावपळ करावी लागल्याचे चित्र दिसून आले़ लाखोंची उलाढालगणेशोत्सवानिमित्त मूर्ती, आरास साहित्य, पूजा साहित्य आदींच्या खरेदीतून लाखोंची उलाढाल झाली.पोलिस, होमगार्ड यांनी ठेवला चोख बंदोबस्तगणपती आगमनानिमित्त अनेक मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व होमगार्ड  यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठेही अनुचित प्रका घडला नाही. 

टॅग्स :Dhuleधुळे