सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात आधारलिंक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांची गैरसाेय होऊ नये, यासाठी दुकानांतील ई-पाॅस उपकरणांमधील ई-केवायसी व मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाईल क्रमांक लिंक करता येणार आहे. त्यासाठी धुळे शहर, ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यातील ९८१ रेशनदुकानांवर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी माहिती द्यावी
लाभार्थ्यांनी रेशन दुकानदाराकडे आधार कार्डची छायांकित प्रत व अंगठा द्यावा. जिल्ह्यात २ लाख १७ हजार लाभार्थ्यांचे आधार सिडिंग झालेले नाही. जे लाभार्थी अस्तित्वात नाही किंवा ज्यांनी २ ते ३ महिन्यांपासून धान्याची उचल केलेली नाही, त्या लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहे.
२ हजार ७०० आधार लिंक
जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशनकार्डला आधार लिंक करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यत ९८१ रेशदुकानातील २ हजार ७०० ग्राहकांनी आधारलिंक केले आहे. तर धुळे शहर व तालुक्यातील ७९ हजार ९५७, साक्री तालुका ५९ हजार ७१, शिंदखेडा ४१ हजार ९९० तसेच शिरपूर तालुक्यातील ३३ हजार ६३२ असे एकून २ लाख १४ हजार ६५० रेशनकार्ड धारकांचे आधारलिंक अद्याप झालेली नाही. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.