शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ५३८ जणांकडे शस्त्राचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 11:14 IST

जिल्हा प्रशासन : नुुतनीकरणासाठी आता अंतिम मुदत

ठळक मुद्देजिल्ह्यात ५३८ जणांकडे शस्त्राचा परवानानुतनीकरण बाकी असलेल्यांसाठी ३१ मार्चची अंतिम मुदतजिल्हा प्रशासनाच्या गृह विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वत:च्या सुरक्षिततेसाठी शस्त्र बाळगण्याचा नवा फंडा आता उदयास येत आहे़ जिल्ह्यात सद्यस्थितीत ५३८ जणांकडे शस्त्राचा परवाना आहे़ त्यातील काही जणांचे नुतनीकरण बाकी असल्याने त्यांचा ३१ मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे़ केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार शस्त्र नियम २०१६ लागू करण्यात आले आहेत़ शस्त्र नियम २०१६ मधील नियम ११ नुसार प्रत्येक नवीन शस्त्र परवाना धारकांना युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक अर्थात यूआयएन प्राप्त करुन घेण्याकरीता नॅशनल डाटाबेस आर्म्स लायसन्स या आॅनलाईन संगणक प्रणालीवर माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे़ किंबहुना, या प्रणालीवर ज्या शस्त्र परवाना धारकांची नोंद राहिल तेच परवाने विधीग्राह्य राहतील़ नोंद नसणाºया शस्त्रांचे परवाने रद्द ठरविण्यात येतील़ या प्रणालीनुसार युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक प्राप्त असलेल्या शस्त्र परवानाधारकांचेच परवाने नुतनीकरण, शस्त्रांची खरेदी-विक्री, पत्ता बदल आणि अन्य अनुषंगिक बाबींचे काम आर्म लायसन्स इन्शुरन्स सिस्टिम प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत ३१ मार्च २०१८ पुर्वी आवश्यक त्या माहितीसह तात्काळ संपर्क साधावा़ दिलेल्या मुदतीत जे शस्त्र परवानाधारक आॅनलाईनबाबतची माहिती सादर करणार नाहीत, अशा शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द ठरविण्यात येतील़