शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाख मेट्रीक टन चा-याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:13 IST

जिल्हा पशुसंवर्धन विभाग  : जिल्ह्यातील सात लाख गुरांना जुलै २०१९ अखेरपर्यंत चारा उपलब्ध होणार, चारा निर्यातीस बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर निर्माण होणारी चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जुलै २०१९ अखेर पुरेल एवढ्या ६ लाख ५९ हजार ५४४ मेट्रीक टन चाºयाचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी चारा टंचाई उदभवल्यास  पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी सुरवातीपासूनच असमाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने, जिल्ह्याला दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतोय. कमी पावसाअभावी पाणी टंचाई सोबतच चारा टंचाई देखील भासण्याची दाट शक्यता आहे.खरीप हंगामात झालेल्या पेरणीमुळे काही प्रमाणात चारा उपलब्ध आहे. मात्र अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने, रब्बीच्या पेरणीवर त्याचा परिणाम झालेला आहे. मात्र जिल्ह्यात जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, त्यातून काही प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो. येथील पशुसंवर्धन विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात  सध्या ३ लाख २७ हजार ८१४ मेट्रीक टन चारा असून, तो मार्च २०१९ अखेरपर्यंत पुरू शकणार आहे.मार्चनंतर निर्माण होणारी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता संबंधित विभागाने आतापासूनच त्याची तयारी सुरू केलेली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हयातील शेतकºयांना दहा गुंठ्यासाठी मका ५ किलो तर ज्वारी ४ किलो याप्रमाणे  मका ७ हजार ५४८ तर ज्वारीचे बियाणे २१ हजार ५७६ किलोचे वाटप केले आहे.  तसेच मक्याचे १८ हजार ८७५ व ज्वारीचे १८ हजार ३४७ किलो वाढीव बियाण्यांचीही मागणी करण्यात आलेली आहे. पाच किलो मक्याची पेरणी केल्यास त्यातून साडेपाच हजार किलो तर ४ किलो ज्वारीची लागवड केल्यास त्यातून ४४०० किलो चाºयाची उपलब्ध ता होत असते. या नियोजनामुळे जवळपास ३ लाख ३१ हजार ७३० मेट्रीक टन चारा उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  चारा टंचाईच्या पार्श्वभूमिवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फतही न्युट्रीफिड बियाण्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळेही चाºयाची उपलब्धता होणार आहे.त्याचबरोबर गाळप क्षेत्रातही मका, ज्वारीची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी मक्याची १० हजार किलो तर ज्वारीची ५ हजार किलो बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.दरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांनी मका, ज्वारी या  बियाण्यांची जास्तीत जास्त लागवड  करून चारा उत्पादन करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे