शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आकाशवाणी केंद्राच्या अधिकाºयाने मागितली महिला कर्मचाºयांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:16 IST

महिला छेडखानीचा आरोप : ‘मनसे’चे आकाशवाणी केंद्रात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रम अधिकाºयाकडून महिलांची छेडखानी होत असल्याची तक्रार येताच ‘मनसे’च्या पदाधिकाºयांनी त्यांच्या दालनात जावून चांगलाच जाब विचारला़ मंगळवारी दुपारी झालेल्या या प्रकारामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते़ धुळे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी प्रदीप जारोंडे यांच्याकडून आकाशवाणी केंद्रातीलच काही महिलांची छेडखानी होत असल्याच्या तक्रारी होत्या़ यासंदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात जावून पीडितांनी आपली कैफियत मांडली होती़ त्यामुळे जारोंडे यांना देवपूर पोलीस ठाण्यातील अधिकाºयांनी पोलीस ठाण्यात बोलावून कायदेशिर तंबी दिली होती़ या घटनेनंतर मनसेच्या पदाधिकारी प्राची कुलकर्णी यांच्याकडे देखील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ तक्रारी येताच प्राची कुलकर्णी यांच्यासह संजय सोनवणे, हर्षल परदेशी, प्रसाद देशमुख, शुभम माळी, तुषार मराठे आदी पदाधिकाºयांनी आकाशवाणी केंद्र गाठले़ प्रदीप जारोंडे यांना त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत चांगलाच जाब विचारला़ एवढ्यावरच न थांबता त्यांनी आकाशवाणी केंद्राच्या बाहेर बोलावून पीडितांची माफी देखील मागायला भाग पाडले़ कान धरुन माफी मागितल्यानंतर पुन्हा असा प्रकार केल्यास तुमची खैर नाही, अशी देखील तंबी प्राची कुलकर्णीसह अन्य पदाधिकाºयांनी दिली़ यावेळी वातावरण अधिकच तणावपुर्ण झाले होते़ आकाशवाणीतील अशा कर्मचाºयाकडून महिलांचे शोषण होऊ नये, घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आकाशवाणी केंद्रातील महिला कर्मचाºयांना कायद्याचे संरक्षण मिळावे तसेच आकाशवाणी केंद्रातील महिलांना सुरक्षा समितीच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आकाशवाणी केंद्राला आदेश करावेत अशी मागणी मनसे पदाधिकाºयांनी यावेळी केली़ 

माझा कोणत्याही प्रकारचा दोष नाही़ कर्मचाºयांची ड्युटी लावण्याचे काम माझ्याकडे असते़ कोणाला जास्त तर कोणाला कमी ड्युटी लावली जात असल्याचा आरोप माझ्यावर नेहमी होत असतो़ त्यांच्या आपापसातील अंतर्गत वादाचा मी बळी ठरलो़ - प्रदीप जारोंडेकार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे