भारतीय राज्यघटनेने एकता, समानता व एकात्मता राष्ट्रवाद ही तत्त्वे मान्य केली आहेत. म्हणून भारतातील सर्वांना एकच कायदा असावा. व्यक्तिगत कायद्यामुळे घटनेच्या तत्त्वात उणीव निर्माण होते. त्यासाठी एक देश एक कायदा असणे काळाची गरज आहे. देशात जात,पंथ व धर्माचे व्यक्तिगत कायदे नसावे. लग्न, संतती, पोटगी, शिक्षण यासाठी समान कायद्याची गरज आहे. गेली ४१ वर्षांपासून हा कायदा लागू करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पार्टी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात समान नागरी कायदा करता येईल असे नमूद केले आहे. या घटनेचा आदर करून हा कायदा लागू करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, भरतसिंग राजपूत, कल्पेश भामरे, अमोल पवार, दीपक जगताप, अमाेल पाटील, प्रमोद पवार, सुधीर पाटील आदींनी केली आहे.
देशात राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST