शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात ९२ वृक्षांच्या तोडीसाठी बांधकाम विभागाचा मनपाकडे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:42 IST

नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची हरकत, बांधकाम विभागाला वृक्षतोडीचा अधिकार

ठळक मुद्दे- पांझरा नदीकाठच्या रस्त्यांना वृक्षांचा अडथळा - बांधकाम विभागाला अधिकार असतांना मनपाकडे अर्ज- नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची आयुक्तांकडे हरकत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदीपात्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना अडथळा ठरणारे ९२ वृक्ष तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपा वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली आहे़ तर शिवेसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी संबंधित अर्जावर हरकत घेतली आहे़ शहरातील पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून प्रत्येकी साडेपाच किमीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत़ या कामांना अडथळा ठरणारे ९२ वृक्ष तोडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एजाज शाह यांनी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीला सादर केला आहे़ निंबाचे २५, पिंपळाचे ५ व इतर ६२ वृक्षांचा समावेश आहे़ नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्जावर हरकत घेतली आहे़ बांधकाम विभागाने फेब्रुवारी महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन वृक्षतोड करण्यासाठी निविदा काढली होती़ त्यानंतर लागलीच परदेशी यांनी हरकत घेतली आहे़ मनपा क्षेत्रात बांधकाम विभाग बेकायदेशिर वृक्षतोड करण्याच्या प्रयत्नात असून ती थांबविण्यात यावी, असा तक्रार वजा अर्ज परदेशी यांनी मनपा आयुक्तांना सादर केला आहे.  महापालिका अधिनियमातील कलम २१ (१) नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या सार्वजनिक रस्त्यांवरील किंवा त्याच्याकडेने असलेली झाडे तोडण्याचा अधिकार बांधकाम विभागाला आहे़ मात्र नगरसेवक परदेशी यांच्या तक्रारीमुळे बांधकाम विभागाने वृक्ष समितीला अर्ज दिल्याची चर्चा मनपा आवारात होती़