शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करा!

By admin | Updated: April 4, 2017 00:57 IST

धरणे आंदोलन : जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीचे जिल्हाधिका:यांना साकडे

धुळे : जिल्ह्यात दारूबंदी करावी, तसेच दारूबंदीचा ठराव झालेल्या गावात संपूर्ण दारूबंदीचे आदेश देऊन आदिवासी महिला सरपंचावर जातीवाचक शिवीगाळ करण्याप्रकरणी दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीतर्फे निदर्शने करण्यात आली.राज्यातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातही दारूबंदी करावी. आजवर जिल्ह्यात अनेक गावांनी दारूबंदीसाठी अनेक वेळा ठराव केलेले आहे. नुसते ठराव करून न थांबता, त्यांनी त्यासाठी अनेक स्तरावर प्रय}सुद्धा केलेत. परंतु आजवर एकही गावात दारूबंदी झालेली नाही. याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपण चार महिन्यांपूर्वी मौजे निकुंभे या गावातील दोन परवाना असलेल्या दुकानांसह अवैध दारूबंदीचे आदेश दिले. परंतु आपण दिलेल्या आदेशाला सोनगीर पोलिसांनी केराची टोपली दाखवली. गावातील दारूबंदी समितीच्या कार्यकत्र्यानी अनेक वेळा दारू मालासह दारूविक्रेत्याला पकडून दिलेले असताना त्यावर कारवाई करण्याऐवजी समितीच्याच लोकांवर लक्ष न देण्यासाठी दबाव आणला जातो. त्यांना हस्तकामार्फत  खोटय़ा केसेस टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. तर दोन पोलीस कर्मचा:यांनी गावातील आदिवासी महिला सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ केली. या दोघी पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.निवेदन समितीचे निमंत्रक नलव        बी ठाकरे, मनीषा ठाकरे, आविष्कार मोरे, सिद्धार्थ जाधव, कृष्णाजी    ठाकरे, मोतीलाल भिल, नेमाजी सैंदल, शानाभाऊ पाटील, अमरदीप पवार यांनी दिले. समितीतर्फे    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही दिले.आतार्पयत साक्री तालुक्यातील कासारे, दिगावे, बेहेड, इंदवे, हट्टी खुर्द, सातारपाडा, छडवेल पखरून, प्रतापपूर, कावठे, घोडदे, वरधाने, खोरी, खुडाणे, उमरांडी, बोदगाव तसेच शिंदखेडा तालुक्यातील पढावद, देगाव, वर्शी, लामकानी, धुळे तालुक्यात फागणे, धाडरा, दोंदवाड, कुसुंबा, उडाणे, गोताणे, चौगाव, कापडणे, शिरपूर तालुक्यातील अनेक गावांनी दारूबंदीसाठी अनेकवेळा ठराव व प्रय} केले आहेत. परंतु आजही गावात प्रचंड प्रमाणात सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातून दारू हद्दपार करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.