शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अनिल गोटे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:06 IST

धुळयात सायंकाळी सभा : सभेत करणार खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  धुळे शहर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा आज मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला. आमदारकीचा राजीनामा आणि लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीसंदर्भात धुळ्यात सायंकाळी आयोजित प्रचार सभेत खुलासा करणार असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्यांच्या सभेकडे लागले आहे.धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे हे महापालिका निवडणुकीपासूनच पक्षाविरोधात भूमिका घेत आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाविरोधात स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण भाजपा उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे सांगितले. तसेच रविवारी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेतसुद्धा आपण उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट करुन पक्षाविरोधात बंड पुकारले होते. आमदार अनिल गोटे यांची सोमवारी सायंकाळी धुळ्यात प्रचार सभा होणार आहे.दरम्यानच्या काळात सोमवारी दुपारी आमदार अनिल गोटे यांनी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच धुळ्याकडे रवाना झाले. सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचारसभेत यासंदर्भात ते काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.सभेच्या बॅनरवर प्रधानमंत्री- सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचारसभेसाठी आमदार अनिल गोटे यांनी उभारलेल्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा व  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे. तसेच अनिल गोटे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत असेही म्हटले आहे.दरम्यान, आपण आमदार पदाचा राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला आहे. तसेच मंगळवारी आपण धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. याबाबत आपण सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचार सभेत आपली भूमिका मांडणार आहोत, असे आमदार अनिल गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे