शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची मोटार सुरू केल्याचा राग, एकावर लोखंडी पावडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 21:10 IST

साक्री तालुक्यातील दरीपाडा शिवारात घडली घटना

धुळे : विहिरातील पाण्याची मोटार सुरू केल्याचा राग आल्याने तिघांनी एका प्रौढाला मारहाण केली. ही घटना साक्री तालुक्यातील दरीपाडा शिवारात घडली. यात लोखंडाच्या पावडीचा वापर झाल्याने जखमी झालेल्या इसमाला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद झाली. साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे शिवारातील दरीपाडा येथे सुभाष महारू शिंदे यांचे (५०) यांचे शेत आहे. कांद्याचे पीक त्यांनी आपल्या शेतात घेतले आहे. त्या पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी विहिरीतील पाण्याची इलेक्ट्रिल मोटार सुरू केली. परिणामी कांद्याच्या पिकाला पाणी देण्यास सुरुवात झाली. ही मोटार सुरू केल्याचे वाईट वाटल्याने तीन जण त्याठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातील एकाने तर लोखंडाची पावडीच उचलली आणि उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली मारल्याने गंभीर दुखापत झाली. अन्य दोघांनी शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला. यानंतर जखमी अवस्थेत सुभाष शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याप्रकरणी सुभाष शिंदे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अविनाश महारू शिंदे, शिवाजी राजू शिंदे, छोटू महारू शिंदे (सर्व रा. दरीपाडा पोस्ट डांगशिरवाडे, ता. साक्री) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल शिरसाठ करीत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे