शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीतील निर्णयात दगाफटका झाल्यास सर्व मार्ग खुले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:17 IST

आमदार अनिल गोटे : सोमवारी रात्रीच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय 

ठळक मुद्देपक्षाच्या धुळे येथील दोन्ही निवडणूक कार्यालयात प्रक्रिया सुरूच अनिश्चिततेचे वातावरण कायम, रात्रीच्या बैठकीकडे सा-यांचे लक्ष मनपा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा उद्या अंतिम दिवस 

लोकमत आॅनलाईनधुळे  : येथील महापालिकेची निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली होईल व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशा दोन मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी रविवारी झालेल्या बैठकीत एकमत झाले. आहे. परंतु या निर्णयात दगाफटका झाला तर सर्व मार्ग खुले आहेत. अर्थात सोमवारी रात्री पुन्हा बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होईल, असे आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. यामुळे यासंदर्भात अनिश्चिततेचे वातावरण असून नामनिर्देशन पत्र भरण्याचा मंगळवारी अंतिम दिवस असल्याने पक्षाच्या येथील दोन्ही निवडणूक कार्यालयांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. मात्र सा-यांचे लक्ष मुंबईत आज रात्री होणा-या बैठकीकडे लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत डावलण्याच्या मुद्यासह पक्षातर्फे गुंडांना पक्षात प्रवेश व निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याच्या मुद्यावर आमदार अनिल गोटे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पािहल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच स्वत:ला महापौर पदाचे उमेदवारही जाहीर केले होते. राज्य विधानसभेचे अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. त्यासाठी आमदार गोटे शनिवारीच मुंबईला रवाना झाले होते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार गोटे यांनी चर्चा केली. त्यात निवडणुकीचे नेतृत्व व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, या मुद्यांवर एकमत झाले. त्याबदल्यात आमदार गोटे यांनी राजीनामा देण्याचा आग्रह सोडून द्यावा, असे ठरले. मात्र दुस-या गटाकडून, ए.बी. फॉर्म आम्हीच वाटू , वेळ काढू अशा प्रकारच्या वल्गना होत आहे. त्यामुळे मी आजच पक्षनेतृत्वास स्पष्ट जाणीव करून दिली आहे की, मी प्रामाणिकपणे सर्व मान्य केले आहे. जर माझ्याशी दगाफटका कराल तर मला माझे सर्व मार्ग मोकळे आहेत. अर्थात आज रात्री पुन्हा बैठक होणार असून त्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे आमदार गोटे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण