शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सर्व व्यापारी दुकाने रविवारपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST

धुळे : धुळे जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने १५ ऑगस्टपासून सर्व दिवस रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात ...

धुळे : धुळे जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने १५ ऑगस्टपासून सर्व दिवस रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

कोरोना विषाणूमुळे उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी विविध उपाययोजनांची केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडील २ ऑगस्ट रोजी सुधारित निर्देश पारित केले आहे. त्याअनुषंगाने

उपहारगृहे : खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने पुढील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे. उपहारगृहे, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह/बारमध्ये काम करु शकतील. उपहारगृह/बारमध्ये विहीत शारीरिक अंतराचे पालन करावे.

उपहारगृह/बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनेटायझरची व्यवस्था तसेच उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. तसेच जेवण ९ वाजेपर्यंत घ्यावी. मात्र, पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

दुकाने : जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. शॉपिंग मॉल्स : जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून-स्पा : वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून-स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, या संस्था वातानुकुलित असल्यास वायूविजनासाठी फॅन व वातानुकुलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.

इनडोअर स्पोर्टस : या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायूविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन, टेबल- टेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

कार्यालय/औद्योगिक/सेवाविषयक आस्थापना : सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करावे.

खासगी कार्यालय- वेळेच्या व्यवस्थापनासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.

विवाह सोहळे : खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय/हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

खुल्या प्रांगण/लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत राहील. बंदिस्त मंगल कार्यालय/हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल/मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : जिल्ह्यातील सर्व सिनेमागृह/नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे : जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील.

गर्दी/जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, प्रचार, सभा, रॅली, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई- फौजदारी कारवाईस पात्र राहील. सदरचा आदेश 15 ऑगस्ट 2021 पासून अमलात येईल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.