धुळे : दिल्ली येथील संमेलनात देशभरातून आलेल्या मुस्लिम बांधवांच्या आरोग्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे़ जिल्ह्यातून गेलेल्या पाचही जणांच्या आरोग्याची तपासणी कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आली़ त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी दिली़दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण दिल्लीखेरीज देशाच्या अनेक राज्यात पसरले असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे़ या संमेलनात सहभागी झालेल्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला असल्याने हा विषय आता गांभिर्याने घेण्यात आलेला आहे़ या संमेलनात १२ ते १५ मार्च या कालावधीत राज्यातील १०९ भाविकांचा सहभाग असल्याचे समोर येत असून त्यात धुळे जिल्ह्यातून ५ भाविक सहभागी असल्याची आकडेवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे़जिल्ह्यातून पाच जणंनिजामपूरमधील तीन आणि धुळे शहरातील दोघांचा समावेश होता़ लागण झालेले विविध भाविक आपापल्या राज्यात गेले आहेत़ त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी आता त्यांच्याखेरीज त्यांच्या संपर्कात आलेल्या हजारो लोकांचा मागोवा घेतला जात आहे़ त्यांचेही विलगीकरण करण्याचे काम राज्यांना युध्दपातळीवर करावे लागत आहे़ पोलिसांनी आत्तापर्यंत २ हजार ३६१ लोकांना बाहेर काढले असून त्यातील ६१७ जणांना दिल्लीतील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़तातडीने केली तपासणीया संमेलानात राज्यातून लोकं गेले असल्याने धुळे जिल्ह्यातून कोण गेले होते त्याच्या माहितीचे संकलन पोलिसांकडून करण्यात आले़ त्यात साक्री तालुक्यातील निजामपूर येथील तीन आणि धुळे शहरातून २ असे पाच जणं समोर आले़ त्यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले़ त्यांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल हा निगेटीव्ह आलेला आहे़सर्वांचीच केली तपासणीकोरोनाच्या अनुषंगाने या पाचही जणांची तपासणी केली़ त्यांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे़ असे असलेतरी हे पाच जणं कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत, त्यांच्या माहितीचे संकलन पोलिसांनी लागलीच केले़ अशा १५ ते २० जणांची चौकशी करुन त्यांच्याशी आरोग्याची तपासणी करुन घेण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन प्राप्त झाल्या़ सुरक्षितता म्हणून त्यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे़
दिल्ली संमेलनातून धुळे जिल्ह्यात आलेले पाचही निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:13 IST