शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार परवानगीसाठी दिवसभर लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:06 IST

आठ दिवसांचा कालावधी शिल्लक : आतापर्यंत १२० जणांना परवानगी, पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराला केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने मनपात एक खिडकी कार्यालय दिवसभर गजबजले होते़ एक खिडकी योजना कार्यालयाकडून आतापर्यंत १२० उमेदवारांना १२० बॅनर्स व ३४ वाहनांना परवानगी देण्यात आली आहे़ प्रचार साहित्य परवानगी व वाहन तपासणीतून सुमारे दिड लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे़मनपा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे़ त्यामुळे प्रचार साहित्यास परवानगी घेण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मनपातील एक खिडकी योजनेच्या कार्यालयात गर्दी होत आहे़ लोटगाडी, सायकल, दुचाकी, रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, चारचाकी वाहने, मोठी वाहने, लाऊड स्पीकर यासाठी मनपाची परवानगी घेणे आवश्यक आहे़ मात्र परवानगी घेताना वाहनांच्या नंबरप्लेट झाकल्या जाणार नाही, याची खबरदारी उमेदवारांना घ्यावी लागणार असून आरटीओ विभागाकडून वाहनांची तपासणी करून घेतली जात आहे़ उमेदवारांच्या समर्थकांची नाराजी, बंदोबस्तात प्रक्रियागुरूवारी दिवसभर एक खिडकी योजनेचे कार्यालय गजबजल्याचे चित्र दिसून आले़ उमेदवारांचे नातेवाईक व समर्थक प्रचार साहित्य परवानगीसाठी रांगा लावत होते़ चिन्ह वाटप प्रक्रियेनंतर प्रचाराला सुरूवात झाली असली तरी काही उमेदवारांना अजूनही परवानगी मिळालेली नाही़ त्यामुळे त्यांना प्रचाराला सुरूवात करता आलेली नाही़ दरम्यान, गुरूवारी एक खिडकी योजनेच्या कार्यालयात गर्दी झाली होती़ आरटीओ विभागाचे काही कर्मचारी उपस्थित नसल्याने परवानगी घेण्यासाठी आलेल्या काहींनी गोंधळ घालत नाराजी व्यक्त केली़ प्रचाराला अल्प कालावधी असताना परवानगी कधी मिळेल, प्रचार कधी करणार? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला़ त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता़ तत्काळ पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला़ त्यानंतर दिवसभर बंदोबस्तात प्रक्रिया सुरू होती़ भरारी पथकांची ४ वाहने कमीमहापालिकेने निवडणूकीत ठोस कारवाई करण्यासाठी ६ भरारी पथके नेमली होती़ मात्र या पथकांकडून ठोस कारवाई न झाल्याने पथकांना देण्यात आलेल्या वाहने कमी करण्यात आली आहेत़  भरारी पथकांकडून केवळ सात ते आठ ठिकाणी किरकोळ कारवाई झाली़ त्यामुळे या पथकांची वाहने काढून ती निवडणूक निरीक्षक, आयकर विभागाच्या पथकांना दिली जाणार आहेत़ ‘शिट्टी’साठी दाखल याचिका फेटाळली़आमदार अनिल गोटे यांनी शिट्टी हे निवडणूक चिन्ह मागणी केलेल्या सर्व उमेदवारांना देण्यात यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांची भेट घेतली होती़ मात्र शिट्टी हे मुक्त चिन्ह असल्याने ते सर्व उमेदवारांना देता येणार नाही, असे मिसाळ यांनी स्पष्ट केल्याने प्रभाग १२ सह केवळ १९ उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे़   दरम्यान, आमदार अनिल गोटे यांनी त्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्याबाबत बुधवारी कामकाज झाले होते़ त्यानंतर गुरूवारी अंतिम कामकाजाअंती आमदार गोटे यांची मागणी फेटाळण्यात आली़ त्यामुळे आता आमदार अनिल गोटे हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे़  समान चिन्ह न मिळाल्याने लोकसंग्रामच्या उमेदवारांची अंतिम यादी अजूनही स्पष्ट झालेली नाही़ दरम्यान, ज्या १९ उमेदवारांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले, त्यापैकी १६ उमेदवार हे आमदार अनिल गोटे यांचे समर्थक असल्याचे लोकसंग्रामने स्पष्ट केले आहे़  औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळल्याने आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारांना वेगवेगळया चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे़ त्यामुळे त्यांचा प्रचाराचा फंडा कसा राहतो, याची सर्वांनाच उत्सुकता असेल़ 

टॅग्स :Dhuleधुळे