शिरपूर : शिरपूर तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात देशी-विदेशी दारुचा साठा असून आर्थिक व्यवहार होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली़ लागलीच पथकाने धाड टाकून एका कारसह दारुचा मोठा साठा जप्त केला़ ही कारवाई रविवारी सायंकाळी उशिराने करण्यात आली़ ७ लाख ६४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़एमएच १८ व्हीसी ०९५१ क्रमांकाची कार आंबा शिवारात दारुचा साठा घेण्यासाठी आली़ कार अडविण्यात आल्यानंतर कारची तपासणी करण्यात आली़ कारमध्ये ७३ हजार ६७० रुपये किंमतीची विदेशी दारु मिळून आली़याप्रकरणी जयपाल प्रकाशसिंग राजपूत (गिरासे), प्रविण पावरा, दीपक बन्सीलाल धोबी, विशाल विनायक वाघ (धुळे) आणि हितेश जयस्वाल (रा़पळासनेर, ता़ शिरपूर) यांच्या विरोधात दारुबंदी कायदानुसार शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ यातील प्रविण पावरा आणि दीपक धोबी हे दोघे घटनास्थळावरुन फरार झालेले आहेत़ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, कर्मचारी रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप यांनी ही कारवाई केली आहे़
दारुची तस्करी एलसीबीने रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:48 IST