माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचाशी चर्चाविमर्श करून भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी आकाश मराठे यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे.
नियुक्तीपत्र देतेवेळी धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, निलेश मराठे, गणेश शिरसाठ उपस्थित होते. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता युवा मोर्चा शिरपूर तालुकाध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्या कार्याची दखल घेऊन आपली भारतीय जनता युवा मोर्चा शिरपूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.
आकाश मराठे यांच्या नियुक्तीबद्दल माजीमंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील आदींनी अभिनंदन केले़